Home Bibles ☰ Books उत्पत्ति 30:8 · मराठी बायबल
उत्पत्ति 30:8 · मराठी बायबल

राहेल म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी जिद्दीने स्पर्धा करुन कठीन लढा दिला आहे व जय मिळवला आहे.” तेव्हा तिने त्याचे नाव नफताली ठेवले.

Cross references

उत्पत्ति 23:6

“स्वामी, परमेश्वराच्या महान नेत्यांपैकी आपण एक आम्हामध्ये आहा; आम्हाकडे असलेल्या जागांपैकी चांगल्यातली चांगली जागा आपल्या मयतासाठी आपण घेऊ शकता; आमच्या कफनाच्या जागांपैकी तुम्हाला हवी ती जागा तुम्ही घेऊ शकता. अशा ठिकाणी आपल्या पत्नीला पुरण्यास आम्ही कोणीही मना करणार नाही.”

उत्पत्ति 32:24

नदी उतरुन पलीकडे जाण्यात याकोब सर्वात शेवटी होता; परंतु नदी उतरुन जाण्यापूर्वी तो अद्याप एकटाच असताना एक पुरुष आला व त्याने याकोबाशी झोंबी केली. सूर्य उगवेपर्यंत त्याने त्याच्याशी झोंबी केली

उत्पत्ति 35:25

राहेलीची दासी बिल्हा हिचे मुलगे - दान व नफताली;

उत्पत्ति 46:24

नफतालीचे मुलगे; यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते.

उत्पत्ति 49:21

“नफताली मोकळ्या सुटलेल्या बागडणाऱ्या हरिणीप्रमाणे होईल; त्याचे शब्द म्हणजे त्याचे बोलणे हरिणींच्या पाडसाप्रमाणे गोड व सुंदर असेल.”

निर्गम 9:28

हा देवाकडून झालेला गारांचा मारा व मेघांचा गडगडाट फार भयंकर झाला! हे वादळ थांबविण्यास देवाकडे विनंती करा आणि मग मी तुम्हाला जाऊ देतो.”

अनुवाद 33:23

नफताली विषयी मोशेने सांगितले, नफताली, तुला सर्व चांगल्या गोष्टी “भरभरुन मिळतील. तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील. गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल.”

1 शमुवेल 14:15

तेव्हा छावणीत, शेतात, किल्ल्यावर पसरलेल्या सर्व पलिष्ट्यांमध्ये घबराट पसरली. चांगल्या शूर सैनिकांनीही धास्ती घेतली. त्यांच्या पायाखालची भूमी कंपायमान झाली आणि पलिष्टी भयभीत झाले.

मत्तय 4:13

परंतू तो नासरेथ येथे राहिला नाही, तर गालील सरोवराजवळील कफर्णहूम नगरात जाऊन राहिला. जबुलून व नफताली ह्या प्रदेशांना लागुनच कफर्णहूम नगर आहे.

Interlinear

Choose Theme