Home Bibles उत्पत्ति 29:6 · मराठी बायबल
उत्पत्ति 29:6 · मराठी बायबल

याकोबाने त्यांना विचारले, “तो बरा आहे काय?”त्यानी उत्तर दिले, “तो बरा व खुशाल आहे आणि त्याचे सर्वकाही चांगले आहे. ती पाहा त्याची मुलगी राहेल, त्याची मेंढरे घेऊन इकडे येत आहे.”

Cross references

उत्पत्ति 37:14

योसेफाचा बाप म्हणाला, “शखेमाला जा; आणि तुझे भाऊ सुखरुप आहेत का?; व माझी मेंढरे ठीक आहेत का ते पाहा व मागे येऊन मला त्यांच्या संबंधी सांग.” अशा रीतीने योसेफाच्या बापाने त्याला हेब्रोन दरीतून शखेमास पाठवले.

उत्पत्ति 43:27

मग योसेफाने ते सर्व बरे खुशाल आहेत ना, याची विचारपूस केली. तो म्हणाला, “तुमचे म्हातारे वडील, ज्यांच्याबद्दल तुम्ही मागे मला सांगितले, ते बरे आहेत का? ते अजून जिवंत आहेत ना!”?

निर्गम 18:7

तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला भेटावयास सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्याला नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारली. नंतर ते अधिक बोलणे करावयास मोशेच्या तंबूत गेले.

1 शमुवेल 17:22

आपले सामान रसदीच्या राखणदारावर सोपवून दावीद सैन्याकडे धावला. भावांचा शोध घेऊन.

1 शमुवेल 25:5

तेव्हा दावीदाने दहा तरुणांना त्याच्याशी बोलायला पाठवले. तो म्हणाला, “कर्मेलला जा. नाबालला भेटा आणि माझ्यातर्फे त्याला नमस्कार सांगा.”

2 शमुवेल 20:9

त्याने अमासाला विचारले, “तुझे सर्व कुशल आहेना?”आणि अमासाचे चुंबन घेण्यास यवाबाने आपला उजव्या हाताने अमासाची दाढी धरुन त्याला पुढे खेचले.

Interlinear

Choose Theme