Home Bibles निर्गम 18:7 · मराठी बायबल
निर्गम 18:7 · मराठी बायबल

तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला भेटावयास सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्याला नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारली. नंतर ते अधिक बोलणे करावयास मोशेच्या तंबूत गेले.

Cross references

उत्पत्ति 14:17

मग कदार्लागोमर व त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम आपल्या घरी गेला; तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्याला भेटावयास गेला. (त्या खोऱ्याला आता राजाचे खोरे असे म्हणतात.)

उत्पत्ति 18:2

अब्राहामाने वर पाहिले तों आपल्या समोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले; त्यांना पाहून अब्राहाम धावत त्यांना सामोरा गेला आणि त्याने त्यांना लवून नमन केले;

उत्पत्ति 19:1

त्या दिवशी संध्याकाळी ते दोन देवदूत सदोम नगरात आले. नगराच्या वेशी जवळ बसलेल्या लोटाने त्यांस पाहिले; लोट उठून त्यांस सामोरा गेला आणि त्याने त्यांस आदराने लवून नमल केले.

उत्पत्ति 29:13

आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान लाबानाने ऐकले तेव्हा लाबान धावत त्याला भेटावयास गेला; त्याने याकोबला मिठी मारली व त्याची चुंबने घेतली आणि त्याला आपल्या घरी आणले; मग याकाबाने घडलेल्या सर्व गोष्टी आपला मामा लाबान याला सांगितल्या.

उत्पत्ति 31:28

अरे, तू मला माझ्या लाडक्या नातवांचा व माझ्या प्रिय मुलींचा निरोप घेण्याची संधी ही दिली नाहीस की त्यांची चुंबने घेण्यास सवड दिली नाहींस! तू हा अगदी मूर्खपणा केलास!

उत्पत्ति 33:3

याकोब स्वत: एसावा पुढे सामोरा गेला म्हणून एसावा समोर पुढे आलेला तोच पहिला होता; आपला भाऊ एसाव याला सामोरा जात असताना त्याने सात वेळा भूमिपर्यंत लवून त्याला नमन केले.

उत्पत्ति 43:27

मग योसेफाने ते सर्व बरे खुशाल आहेत ना, याची विचारपूस केली. तो म्हणाला, “तुमचे म्हातारे वडील, ज्यांच्याबद्दल तुम्ही मागे मला सांगितले, ते बरे आहेत का? ते अजून जिवंत आहेत ना!”?

उत्पत्ति 45:15

मग योसेफाने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला; यानंतर त्याचे भाऊ त्याज बरोबर बोलू लागले.

उत्पत्ति 46:29

आपला बाप जवळ येत आहे असे योसेफास समजले; तेव्हा तो आपला रथ तयार करुन आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्याला सामोरा गेला. योसेफाने आपल्या बापास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यातगळ घालून तो बराच वेळ रडला.

गणना 22:36

बलाम येत असल्याचे बालाकाला समजले. म्हणून तो बलामला भेटायला अर्णोन नदी जवळच्या मवाबच्या शहरात गेला. ते त्याच्या देशाच्या उत्तर सरहद्दीवर होते.

शास्ते 11:34

इफ्ताह मिस्पा येथे परतला. तो घरी पोचतो तो त्याची मुलगी त्याला सामोरी आली. त्याची ही एकुलती एक मुलगी खंजिरी घेऊन नृत्य करत पुढे आली. इफ्ताहचे तिच्यावर जिवापाड प्रेम होते तिच्याखेरीज त्याला दुसरे मूलबाळ नव्हते.

1 शमुवेल 17:18

तसंच, तुझ्या भावांच्या छावणीवरच्या हजारी अधिकाऱ्याला या पनीरच्या दहा वड्या दे. भावांची खुशाली विचार. ते सुखरुप आहेत याची पावती म्हणून माझ्यासाठी काहीतरी खूण आण.

1 शमुवेल 17:22

आपले सामान रसदीच्या राखणदारावर सोपवून दावीद सैन्याकडे धावला. भावांचा शोध घेऊन.

2 शमुवेल 11:7

उरीया आल्यावर दावीद त्याच्याशी बोलला. उरीयाला त्याने यवाब, सर्व सैन्य, लढाई यांचे वर्तमान विचारले.

1 राजे 2:19

मग बथशेबा राजा शलमोनाकडे गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करुन तो सिंहासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे सिंहासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.

स्तोत्रसंहिता 2:12

तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा. तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात. पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे. तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे.

लूक 7:45

तू मला साधे शुभेच्छालिंगन सुध्दा दिले नाहीस, पण मी आत आल्यापासून तिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 20:37

तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले, ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले.

प्रेषितांचीं कृत्यें 28:15

तेथील बंधुनी आमच्याबद्दलची वार्ता ऐकली होती. ते आमच्या भेटीसाठी अप्पीयाच्या बाजारपेठेपर्यंत आणि तीन धर्मशाळेपर्यंत आले. पौलाची त्यांची भेट झाल्यावर त्याने देवाचे उपकार मानले, व त्याला धीर आला.

Interlinear

Choose Theme