तेव्हा एसाव याकोबाला म्हणला, “मी भुकेने व्याकूळ झालो आहे तर मला थोडे तांबड्या डाळीचे वरण खावयास घेऊ दे;” यावरुन लोक त्याला अदोम (म्हणजे तांबडा) म्हणत.
Cross references
त्याने त्यांना सांगितले “तुम्ही या सर्व गोष्टी माझे स्वामी एसाव त्यांना सांगा, ‘आपला सेवक याकोब असे म्हणतो की आजपर्यंत अनेक वर्षे मी लाबानाकडे राहिलो;
एसाव (म्हणजे ‘अदोम’) याची वंशावळ
एसाव हा अदोमी लोकांचा मुळ पुरुष होय. सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहाणाऱ्या एसावाची वंशावळ:
हे सर्व पुरुष एसावापासून (अदोमपासून) झालेल्या कुळांचे नेते होत.
मग अदोमाची कुटुंबे व मवाबाचे बलवान लोक भीतीने थरथरा कांपतील आणि कनानी लोकांचे धैर्य पावेल.
मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमच्या राजाकडे काही लोकांना एक निरोप देऊन पाठवले. तो निरोप होता: “तुझे भाऊ, इस्राएलचे लोक तुला म्हणतात: आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच.
“अदोमी लोकांचा कधीही तिरस्कार करु नका. कारण ते तुमचे आप्त आहेत. तसेच मिसरींचा द्वेष करु नका. कारण त्यांच्या देशात तुम्ही उपरे होतात.
यहोरामच्या कारकिर्दीत अदोम यहूदापासून वेगळा झाला. अदोमी लोकांनी स्वत:च राजाची निवड केली.
हा ओबद्याचा दृष्टांन्त आहे. परमेश्वर, माझा प्रभू अदोमाबद्दल पुढील प्रढील प्रमाणे म्हणाला: आम्ही परमेश्वर देवाकडून हकिगत ऐकली. राष्ट्रांकडे दूत पाठविला गेला. तो म्हणाला, “आपण अदोमाविरुध्द लढण्यास जाऊ या.”