Home Bibles अनुवाद 23:7 · मराठी बायबल
अनुवाद 23:7 · मराठी बायबल

“अदोमी लोकांचा कधीही तिरस्कार करु नका. कारण ते तुमचे आप्त आहेत. तसेच मिसरींचा द्वेष करु नका. कारण त्यांच्या देशात तुम्ही उपरे होतात.

Cross references

उत्पत्ति 25:24

मग रिबकेची प्रसूतीची वेळ आली तेव्हा तिला जुळी मुले झाली;

उत्पत्ति 25:30

तेव्हा एसाव याकोबाला म्हणला, “मी भुकेने व्याकूळ झालो आहे तर मला थोडे तांबड्या डाळीचे वरण खावयास घेऊ दे;” यावरुन लोक त्याला अदोम (म्हणजे तांबडा) म्हणत.

उत्पत्ति 45:17

तेव्हा फारो योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग की तुम्हाला गरज असेल तेवढी अन्नसामग्री घेऊन कनान देशास जा;

उत्पत्ति 47:6

त्यांना राहण्याकरिता तू मिसरमधील कोणतेही ठिकाण निवड; त्यांना उत्तम जमीन असलेला प्रदेश दे. त्याना गोशेन प्रांतात वस्ती करुन राहू दे; आणि ते जर तरबेज व कुशल मेंढपाळ असतील तर मग त्यांनी माझ्या गुराढोरांचीही काळजी घ्यावी.”

उत्पत्ति 47:12

आणि त्याने आपला बाप, आपले भाऊ व त्यांच्या घरचे सर्व यांना भरपूर अन्नसामग्री पुरवली.

उत्पत्ति 47:27

इस्राएल (याकोब) मिसरमध्ये गोशेन प्रांतात राहिला. त्याची संतती खूप वाढली व त्यांची भरभराट झाली; त्यांना मिसरमधील जमीन मिळाली व त्यांनी वतने केली आणि तेथे त्यांचे सर्वकाही चांगले झाले.

निर्गम 22:21

“तुमच्या देशात परका किंवा उपरा कोणी असला तर त्याला तुम्ही फसवू नये किंवा त्याचा छळ करु नये; कारण पूर्वी तुम्ही देखील मिसर देशात परके किंवा उपरे होता याची आठवण ठेवा.

निर्गम 23:9

“तुम्ही परक्याला कधीही छळू नये; परक्याला कसे वाटते हे तुम्हाला चांगले माहीत आहे कारण तुम्ही देखील एकेकाळी मिसरदेशात परके होता.

लेवीय 19:34

तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीय माणसाला स्वदेशीय माणसासारखेच माना; आणि त्याच्यावर स्वत: सारखीच प्रीती करा; कारण तुम्हीही एके काळी मिसरदेशात परदेशीय होता. मी तुमचा देव परमेश्वर आहे!

गणना 20:14

मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमच्या राजाकडे काही लोकांना एक निरोप देऊन पाठवले. तो निरोप होता: “तुझे भाऊ, इस्राएलचे लोक तुला म्हणतात: आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच.

अनुवाद 10:19

म्हणून तुम्ही परक्यांशी प्रेमाने वागले पाहिजे. कारण मिसर देशात तुम्हीही उपरेच होतात.

1 राजे 11:25

अरामवर रजोनने राज्य केले. इस्राएलबद्दल त्याला चीड होती, तेव्हा शलमोनाच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याचे इस्राएलशी वैरच होते. हदाद आणि रजोन यांनी मिळून इस्राएलला बराच त्रास दिला.

एज्रा 9:12

तेव्हा इस्राएल लोकांनो, तुमच्या मुलांशी त्यांच्या ऐश्वर्याची इच्छा करु नका. माझ्या आदेशांचे पालन करा म्हणजे तुम्ही बलशाली व्हाल आणि या भूमीवर चांगल्या गोष्टी भोगाल. हा प्रदेश आपल्या मुलाबाळांना सुपूर्द कराल.”

स्तोत्रसंहिता 105:23

नंतर इस्राएल मिसरमध्ये आला. याकोब हामच्या देशातच राहिला.

ओबद्या 1:10

तू अप्रतिष्ठेने माखशील. आणि तुझा कायमचा नाश होईल. का? कारण तू, तुझा भाऊ याकोब याच्याशी क्रूरपणे वागलास.

मलाखी 1:2

परमेश्वर म्हणाला, “माझे तुमच्यावर प्रेम आहे.”पण तुम्ही म्हणालात, “कशावरुन तू आमच्यावर प्रेम करतोस?”परमेश्वर म्हणाला, “एसाव याकोबचा भाऊ होता. बरोबर? पण मी याकोबला निवडले.

प्रेषितांचीं कृत्यें 7:10

योसेफावर तेथे खूप संकटे आली पण देवाने त्याला सर्व संकटांतून सोडविले, देवाने योसेफाला ज्ञान व शहाणपण दिले. त्यामुळे इजिप्तचा राजा, फारो, याची मर्जी योसेफाला संपादन करता आली. फारोने योसेफाला इजिप्त देशावर व त्याच्या घरावर अधिपती म्हणून नेमले.

Interlinear

Choose Theme