Home Bibles उत्पत्ति 17:13 · मराठी बायबल
उत्पत्ति 17:13 · मराठी बायबल

अशा रीतीने तुझ्या राष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करावी, मग तो तुझ्या कुटुंबातील असो किंवा विकत घेतलेल्या गुलामाच्या कुटुंबात जन्मलेला असो; तुझ्या व माझ्यामध्ये केलेला करार या खुणेवरुन कायम राहील;

Cross references

उत्पत्ति 9:16

आणि ते धनुष्य पाहून कराराची मला आठवण होईल मी पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत प्राण्याशी चिरंतन काळासाठी केलेल्या कराराची मला आठवण होईल.”

उत्पत्ति 14:14

लोटाला कैद करुन नेल्याचे वर्तमान अब्रामाला समजले, तेव्हा त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या सर्वांना एकत्र बोलावले व त्यांच्यातून लढाईच्या कामात कसलेले असे तीनशे अठरा तरबेज लढवैय्ये घेऊन त्याने थेट दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला.

उत्पत्ति 15:3

अब्राम पुढे म्हणाला, “तू मला मुलगा दिला नाहीस म्हणून माझ्या घरात जन्मलेला माझा गुलामच माझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.”

उत्पत्ति 37:27

आपण त्याला जर ह्या इश्माएली व्यापाऱ्यांना विकून टाकले तर आपल्याला अधिक लाभ होईल; आणि आपल्या स्वत;च्या भावाला ठार मारल्याचा दोषही आपणावर येणार नाहीं;” इतर भावांना हे म्हणणे पटले.

उत्पत्ति 37:36

त्या मिद्यानी व्यापाऱ्यांनी योसेफास मिसर देशात नेऊन पोटीफर नांवाचा फारो राजाचा अधिकारी, गारद्यांचा सरदार होता त्यास विकून टाकले.

उत्पत्ति 39:1

योसेफाला विकत घेतलेल्या व्यापाऱ्यांनी त्याला मिसरला नेले व फारो राजाचा एक अधिकारी गारद्यांचा म्हणजे संरक्षक दलाचा सरदार पोटीफर यास विकले.

निर्गम 12:44

परंतु जर कोणी एखादा गुलाम विकत घेतला असेल आणि त्याची सुंता त्याने करवून घेतली असेल तर मग त्या गुलामाने वल्हांडणाचे भोजन खावे;

निर्गम 21:2

“तुम्ही जर एखादा इस्राएली गुलाम विकत घेतला तर त्याने फक्त सहा वर्षे काम करावे; सहा वर्षानंतर सातव्या वर्षी तो मुक्त होऊन स्वतंत्र होईल; भरपाई म्हणून तो तुझे काही देणे लागणार नाही.

निर्गम 21:4

जर तो सडा आला असेल तर त्याच्या मालकाने त्याला बायको करून द्यावी; तिला मुले किंवा मुली झाल्या असतील तर त्याची बायको व तिची मुलेबाळे मालकाच्या मालकीची राहतील; आपली सेवा पूर्ण करताच त्याला एकट्याला मुक्त केले जाईल.

निर्गम 21:16

जो कोणी एखाद्याला चोरून नेऊन गुलाम म्हणून विकेल किंवा गुलाम म्हणून स्वत:कडे ठेवेल तर त्याला अवश्य जिवे मारावे.

लेवीय 22:11

परंतु याजकाने स्वत:चे पैसे देऊन एखादा गुलाम विकत घेतला असेल तर त्या गुलामाने व याजकाच्या घरात जन्मलेल्या त्याच्या मुलाबाळांनी त्या पवित्र अन्नातून खावे.

नहेम्या 5:5

ते श्रीमंत लोक पाहा! आम्ही त्यांच्यासारखेच तर आहोत. त्यांच्या मुलांसारखीच आमची मुले आहेत. पण आम्हांला आमची मुले मुली गुलाम म्हणून विकावी लागली. काहींना तर आपल्या मुलींना गुलाम म्हणून विकणे भाग पडलेले आहे. आम्ही असहाय आहोत. आमची शेती आणि द्राक्षमळे तर गेलेच. ते आता इतर लोकांच्या मालकीचे आहेत.”

नहेम्या 5:8

त्यांना मी म्हणालो, “आपले यहुदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते. त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. आणि आता पुन्हा तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहा!”ते श्रीमंत लोक आणि अधिकारी गप्प राहिले. त्यांना काही बोलायला जागा उरली नाही.

मत्तय 18:25

त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी.

Interlinear

Choose Theme