Home Bibles निर्गम 21:16 · मराठी बायबल
निर्गम 21:16 · मराठी बायबल

जो कोणी एखाद्याला चोरून नेऊन गुलाम म्हणून विकेल किंवा गुलाम म्हणून स्वत:कडे ठेवेल तर त्याला अवश्य जिवे मारावे.

Cross references

उत्पत्ति 37:28

ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खाड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांस वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफास मिसर देशास घेऊन गेले.

उत्पत्ति 40:15

मला माझ्या घरातून व माझ्या मायदेशातून म्हणजे माझ्या इब्री लोकांच्या देशातून येथे बळजबरीने आणले गेले; वास्तविक मला येथे तुरुंगात अटकेत राहाण्याची शिक्षा मिळावी असा मी कोणाचा काहीच अपराध केला नाही.”

निर्गम 22:4

“जर एखादा चोर रात्री घरफोडी करताना सापडला व ठार मारला गेला तर त्याच्या मरणाबद्दल कोणीही दोषी ठरणार नाही; पण असे दिवसाढवव्व्या घडले तर त्याला मारणारा खुनाबद्दल दोषी ठरेल.

अनुवाद 24:7

“कोणी आपल्या इस्राएली बांधवाला पळवले आणि गुलाम म्हणून त्याची विक्री केली तर त्या पळवणाऱ्या माणसाला ठार करावे व आपल्यामधून अशा दुष्कृत्याचे निर्मूलन करावे.

1 तीमथ्याला 1:10

खुनी लोकांसाठी, जारकर्मी, समलिंगसंभोगी, इतर मनुष्यांना फसविणारे, खोटारडे, खोटी शपथ घेणारे यांच्यासाठी आहे. इतर जे दुसरे सगळे करतात ते चांगल्या शिक्षणाविरुद्ध आहेत,

प्रकटीकरण 18:12

तो मालअसा: सोने, चांदी, मौल्यावान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, किरमिजी, रेशमी व जांभळे कापड, निरनिराळ्याप्रकारचे सुगंधी लाकूड, सर्व प्रकारची हस्तीदंती पात्रे, मोलवान लाकडे, तांब्याची, लोखंडाची हस्तीदंती पात्रे, मोलवानलाकडे, तांब्याची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे.

Interlinear

Choose Theme