Home Bibles उत्पत्ति 11:8 · मराठी बायबल
उत्पत्ति 11:8 · मराठी बायबल

तेव्हा परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली म्हणून नगर व बुरुज बांधण्याचे काम तसेच राहिले.

Cross references

उत्पत्ति 10:5

भूमध्यासमुद्रच्या किनाऱ्याच्या आसपास जी राष्ट्रे झाली ती सर्व याफेथाच्या संततीपासून होती; प्रत्येक मुलाला स्वत:ची जमीन होती ही सर्व कुळे वाढत गेली व त्यांची वेगवेगळी राष्ट्रे झाली. प्रत्येक राष्ट्राची भाषा वेगळी होती.

उत्पत्ति 10:25

एबर यास दोन मुलगे झाले; एकाचे नाव पेलेग होते. पेलेग म्हणजे वाटणी; कारण याच्याच हयातीत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.

उत्पत्ति 10:32

ही नोहाच्या मुलांची व त्यांच्या वंशजांची, पिढ्या व कुळाप्राणे यादी आहे; त्यांच्या राष्ट्रांप्रमाणे ती आखलेली आहे; जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर वेगवेगळी राष्ट्रे झाली.

उत्पत्ति 11:4

मग लोक म्हाणाले, “चला, आपण आपणासाठी नगर बांधू; आणि आकाशाला भिडणारा उंचच उंच बुरुज बांधू; असे केले तर मग आपण नावाजलेले लोक होऊ व आपण पांगले जाणार नाहीं तर एके जागी एकत्र राहू.”

उत्पत्ति 11:9

ह्याच ठिकाणी परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला म्हणून त्या नगराला बाबेल म्हटले आहे. अशा रीतीने परमेश्वराने त्या ठिकाणापासून इतरत्र पसरण्यास लोकांना भाग पाडले.

उत्पत्ति 49:7

त्यांचा राग शाप आहे; ते अति रागाने वेडे होतात तेव्हा अतिशय क्रूर बनतात; याकोबाच्या जमिनीत त्यांना वाटा मिळणार नाही. ते सर्व इस्राएल देशभर पसरतील.”

अनुवाद 32:8

परात्पर देवाने लोकांची विभागणी केली, राष्ट्रा राष्ट्रांमध्ये. प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र भूभाग दिला. देवाने इस्राएल सीमा आखल्या. देवदूतांइतकी राष्ट्रे त्याने बनविली.

स्तोत्रसंहिता 33:10

राष्ट्रांचा उपदेश कवडी मोलाचा आहे तो त्यांच्या सगळ्या योजनांचा नाश करु शकतो.

लूक 1:51

त्याने आपल्या बाहूंनी आपले सामर्थ्य दाखविले; गर्विष्ठ लोकांना त्यांच्या बढाईखोर विचारांसह विखरुन टाकले आहे.

Interlinear

Choose Theme