Home Bibles उत्पत्ति 11:4 · मराठी बायबल
उत्पत्ति 11:4 · मराठी बायबल

मग लोक म्हाणाले, “चला, आपण आपणासाठी नगर बांधू; आणि आकाशाला भिडणारा उंचच उंच बुरुज बांधू; असे केले तर मग आपण नावाजलेले लोक होऊ व आपण पांगले जाणार नाहीं तर एके जागी एकत्र राहू.”

Cross references

उत्पत्ति 6:4

नंतर परमेश्वर म्हणाला, “मनुष्य हा देहधारी आहे, तो भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची सत्ता त्यांच्या ठायी सर्वकाळ राहणार नाही; म्हणून मी माझ्या आत्म्याला त्याच्यापासून सतत - त्रास होऊ देणार नाही; तर मी त्यांस एकशेंवीस वर्षांचेच आयुष्य देईन.”

उत्पत्ति 11:8

तेव्हा परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली म्हणून नगर व बुरुज बांधण्याचे काम तसेच राहिले.

अनुवाद 1:28

आता आम्ही कुठे जाणार? आमच्या या भावांच्या ( 12 हेरांच्या) बातम्यांमुळे घाबरुन आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांच्या खबरीनुसार हे लोक धिप्पाड व आमच्यापेक्षा उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांची तटबंदी आकाशाला भिडली आहे. आणि तेथे अनाक वंशी महाकाय आहेत.

अनुवाद 4:27

परमेश्वर देव तुम्हांला वेगवेगळ्या राष्ट्रात विखरुन टाकील. आणि जेथे जेथे तो पाठवील तेथे तुमची संख्या अगदीच अल्प राहील.

अनुवाद 9:1

“हे इस्राएलांनो ऐका, तुम्ही आज यार्देन नदी पलीकडे जाणार आहात. तुमच्यापेक्षा मोठी आणि शक्तिशाली अशी राष्ट्रे ताब्यात घेणार आहात. तेथील नगरे मोठी आहेत. त्यांची तटबंदी आकाशाला भिडलेली आहे.

2 शमुवेल 8:13

क्षार खोऱ्यातील अठरा हजार अरामींचा पाडाव करुन तो परत आला तेव्हा त्याचा जयजयकार झाला.

स्तोत्रसंहिता 49:11

थडगे हेच सर्वांचे सर्वकाळचे नवीन घर असते. आणि त्यांच्याकडे किती जमीन आहे यामुळे त्यात काहीही फरक पडत नाही.

स्तोत्रसंहिता 92:9

परमेश्वरा, तुझ्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल. वाईट गोष्टी करणाऱ्या सर्व लोकांचा नाश होईल.

नीतिसूत्रे 10:7

चांगली माणसे चांगल्या आठवणी मागे ठेवतात. पण वाईट माणसे लवकर विसरली जातात.

दानीएल 4:11

तो खूप वाढला व मजबूत झाला त्याचा शेंडा आकाशाला भिडला.पृथ्वीच्या पाठीवरून तो कोठूनही दिसू शकत असे.

दानीएल 4:22

राजा, तूच तो वृक्ष आहेस, तू महान व सामर्थ्यशाली झाला आहेस आकाशाला भिडणाऱ्या उंच वृक्षाप्रमाणे तू आहेस आणि तुझी सत्ता पृथ्वीच्या टोकापर्यंत पसरली आहे.

दानीएल 4:27

तेव्हा राजा, माझे ऐक पाप करण्याचे सोडून दे. योग्य त्याच गोष्टी कर. वाईट कृत्ये करू नकोस गरिबांवर दया कर. मग कदाचित तुला यशच मिळेल.

लूक 1:51

त्याने आपल्या बाहूंनी आपले सामर्थ्य दाखविले; गर्विष्ठ लोकांना त्यांच्या बढाईखोर विचारांसह विखरुन टाकले आहे.

योहान 5:44

तुम्हांला एकमेकांकडून स्तुति करवून घ्यायला आवडते. परंतु एकाच देवाकडून होणारी स्तुति मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही कधी करीत नाही, मग तुम्ही माझ्यावर कसा काय विश्वास ठेवाल?

Interlinear

Choose Theme