ह्याच ठिकाणी परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला म्हणून त्या नगराला बाबेल म्हटले आहे. अशा रीतीने परमेश्वराने त्या ठिकाणापासून इतरत्र पसरण्यास लोकांना भाग पाडले.
Cross references
भूमध्यासमुद्रच्या किनाऱ्याच्या आसपास जी राष्ट्रे झाली ती सर्व याफेथाच्या संततीपासून होती; प्रत्येक मुलाला स्वत:ची जमीन होती ही सर्व कुळे वाढत गेली व त्यांची वेगवेगळी राष्ट्रे झाली. प्रत्येक राष्ट्राची भाषा वेगळी होती.
शिनार प्रांतातील बाबेल, एरक, अक्काद व कालहने ही निम्रोदाच्या राज्यातील सुरवातीची शहरे होती.
ही सर्व हाम याची वंशजे होती; हया सर्व वंशजांना स्वत:ची भाषा व देश होते; ती सर्व वेगवेगळी राष्ट्रे झाली.
एबर यास दोन मुलगे झाले; एकाचे नाव पेलेग होते. पेलेग म्हणजे वाटणी; कारण याच्याच हयातीत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.
हे शेमाचे वंशज होते. कुळे, भाषा, देश व राष्ट्रे याप्रमाणे त्यांची विभागणी अशी आहे.
आमोजचा मुलगा यशया ह्याला देवाने बाबेलोनबद्दल दु:खदायक हा संदेश दिला.
बाबेल व खास्दी ह्यंच्यासाठी परमेश्वराने पुढील संदेश दिला हा संदेश देवाने यिर्मयामार्फत दिला.
देवाने एका माणसाला (आदाम) निर्माण करुन सुरुवात केली. त्याच्यापासून त्याने वेगवेगळे लोक निर्माण केले. देवाने त्यांना सगळीकडे राहण्यास मुभा दिली. देवाने त्यांना काळ व सीमा ठरवून दिल्या.
म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येकजण दुसऱ्या भाषेत बोलत असेल (आणि) जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला, तर तुम्ही वेडे आहात असे ते तुम्हाला म्हणणार नाही का?