यहेज्केल 40:35 · मराठी बायबल
मग मला त्या माणसाने उत्तरेच्या दाराकडे आणले. त्याने ते मोजले. त्याची मापे इतर दारांप्रमाणेच होती.
Cross references
यहेज्केल 40:27
आतल्या पटांगणाच्या दक्षिणेला एक दार होते. दक्षिणेकडील दारांमधील अंतर त्या माणसाने मोजले. ते 100 हात (175फूट) होते.
यहेज्केल 40:32
त्या माणसाने मला पूर्वेकडून आतल्या अंगणात आणले. त्याने दार मोजले. ते इतर दारांच्या मापाचेच होते.
यहेज्केल 44:4
मग त्या माणसाने मला उत्तरेकडच्या दारातून मंदिरासमोर आणले. मी पाहिले तर काय, परमेश्वराची प्रभा, परमेश्वराच्या मंदिरात, पसरत होती. मी जमिनीला डोके टेकवून नमस्कार केला.
यहेज्केल 47:2
त्या माणसाने मला उत्तरेच्या दाराने बाहेर आणले आणि फिरवून पूर्वेकडील बाहेरच्या दाराकडे नेले. पाणी दाराच्या दक्षिणेकडून येत होते.