मग त्या माणसाने मला उत्तरेकडच्या दारातून मंदिरासमोर आणले. मी पाहिले तर काय, परमेश्वराची प्रभा, परमेश्वराच्या मंदिरात, पसरत होती. मी जमिनीला डोके टेकवून नमस्कार केला.
Cross references
मग अब्रामाने देवाला लवून नमन केले; देव त्याला म्हणाला,
मोशे आणि अहरोन दर्शन मंडपाच्या दारात उभे होते. लोक मोशे आणि अहरोन विरुद्ध तक्रार करायला एकत्र जमले. पण जेव्हा त्यांनी दर्शन मंडपाकडे पाहिले तेव्हा ढंगानी त्याला झाकून टाकले आणि तिथे परमेश्वराचे तेज दिसू लागले.
देव पवित्र लोकांना भोटतो. ते देवदूत त्याच्या सभोवती असतात. ते देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात. ते भयग्रस्त होऊन त्याच्या भोवती उभे राहातात.
ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते.
त्याच्या भोवती फाकलेले तेज इंद्रधनुष्याप्रमाणे होते. ते परमेश्वराच्या वैभवाच्या तेजाप्रमाणे दिसत होते. म्हणून मी ते पाहाताच जमिनीवर पालथे पडून, मस्तक टेकवून वंदन केले. त्या नंतर, माझ्याशी कोणीतरी बोलत असल्याचे मला ऐकू आले.
मग मी उठलो आणि दरीकडे गेलो. खबार कालव्याजवळ पाहिली होती तशीच परमेश्वराची प्रभा तेथे होती. तेव्हा मी नतमस्तक झालो.
मग करुब दूतांवरुन परमेश्वराची प्रभा फाकली आणि मंदिराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली. मग ढगाने मंदिरच व्यापले आणि परमेश्वराच्या प्रभेतून निघालेल्या तेजस्वी प्रकाशाने सर्व अंगणच व्यापले.
मग परमेश्वराची प्रभा मंदिराच्या उंबरठ्यावरुन करुबांच्या वर जाऊन थांबली.
ह्यानंतर करुब दूतांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्यावर होती.
बाहेरच्या पटांगणाच्या उत्तरेकडे तोंड असलेल्या दाराची लांबी व रुंदीही त्या माणसाने मोजली.
द्वारमंडपाच्या बाहेर, उत्तरेच्या दाराच्या तोंडापाशी, दोन टेबले होती. द्वारमंडपाच्या दुसऱ्या बाजूलाही दोन टेबले होती.
मी खबार कालव्याजवळ पाहिलेल्या दृष्टान्तासारखाच हा दृष्टान्त होता मी जमिनीला डोके टेकवून नमस्कार केला.
मी राष्ट्रांना धक्का देईन आणि मग प्रत्येक राष्ट्र तुमच्याकडे संपत्ती घेऊन येईल मग हे मंदिर वैभवाने भरुन टाकीन. सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे.
सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी माझा दूत पाठवीत आहे. तो माझ्यासाठी मार्ग तयार करील. अनपेक्षितपणे तुम्ही ज्याचा शोध करत आहात तो प्रभु त्याच्या मंदिरात येईल तुम्हांला हव्या असलेल्या नव्या कराराचा तो दूत आहे तो खरोखरीच येत आहे.”