Home Bibles यहेज्केल 40:21 · मराठी बायबल
यहेज्केल 40:21 · मराठी बायबल

हे द्वार त्याच्या प्रत्येक बाजूला असलेल्या तीन तीन खोल्या आणि त्याचा द्वारमंडप ह्यांची मापे पहिल्या प्रवेशद्वाराएवढीच होती. द्वार 50 हात लांब व 25हात रुंद होते.

Cross references

यहेज्केल 40:7

चौकीदाराची खोली एक पट्टी (10 फूट 6 इंच) लांब व एक पट्टी (10 फूट 6 इंच) रुद होती. मंदिरासमोरच्या प्रवेशद्वारच्या द्वारमंडपाच्या दाराची रुंदी एक पट्टी होती.

यहेज्केल 40:10

दाराच्या प्रत्येक बाजूला तीन लहान खोल्या होत्या. त्या सारख्या मापाच्या होत्या. दोन्ही बाजूच्या दाराच्या बाजूच्या भिंती सारख्या मापाच्या होत्या.

यहेज्केल 40:25

दार, त्याचा द्वारमंडप ह्यांना इतर दारांप्रमाणेच खिडक्या होत्या. दार 50 हात लांब व 25हात रुंद होते.

यहेज्केल 40:29

दक्षिणेकडच्या दाराजवळच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच होते. दाराच्या व द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43फूट 9 इंच) रुंद होते. त्यांच्या सर्व बाजूंनी द्वारमंडप होते.

यहेज्केल 40:34

त्याच्या द्वारमंडपाचे तोंड बाहेरच्या पटांगणाकडे होते. दाराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम होते. त्याच्या जिन्याला प्रवेशद्वारापर्यंत जाणाऱ्या आठ पायऱ्या होत्या.

यहेज्केल 40:36

त्याच्या खोल्या, बाजूच्या भिंती, व द्वारमंडप हे इतर दारांच्या खोल्या, बाजूच्या भिंती व द्वारमंडप ह्यांच्याच मापाचे होते. ते दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43ूट 9 इंच) रुंद होते.

Interlinear

Choose Theme