Home Bibles यहेज्केल 4:7 · मराठी बायबल
यहेज्केल 4:7 · मराठी बायबल

देव पुन्हा बोलला तो म्हणाला, “आता अस्तन्या सावर आणि विटेवर हात उगार. तू यरुशलेमवर हल्ला करण्याचे नाटक कर. तू माझा दूत म्हणून लोकांशी बोलत आहेस हे दाखविण्यासाठी असे कर.

Cross references

यशया 52:10

परमेश्वर त्याची पवित्र शक्ती सर्व राष्ट्रांना दाखवील. देव त्याच्या लोकांना कसे वाचवितो हे अती दूरच्या सर्व देशांना दिसेल.

यहेज्केल 4:3

एक लोखंडी कढई तुझ्या व नगरीच्या मध्ये ठेव. ही कढई म्हणजे तुला व नगरीला विभागणारी भिंतच होय, ह्या रीतीने तू त्या नगरीच्या विरुद्व आहेस हे दाखव. तू त्या नगरीला वेढा घालून हल्ला करशील. का? कारण हे इस्राएलच्या लोकांसाठी प्रतीक वा खूण असेल. ह्यावरुन मी (देव) यरुशलेमवर हल्ला करणार असल्याचे स्पष्ट होईल.

यहेज्केल 6:2

तो म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलच्या पर्वतांकडे वळ. माझ्यातर्फे त्यांच्याविरुद्व बोल.

यहेज्केल 21:2

“मानवपुत्रा, यरुशलेमकडे पाहा आणि त्यांच्या पवित्र स्थानांच्या विरुद्ध बोल. माझ्यावतीने इस्राएलच्या भूमीविरुद्ध बोल.

Interlinear

Choose Theme