Home Bibles यहेज्केल 4:3 · मराठी बायबल
यहेज्केल 4:3 · मराठी बायबल

एक लोखंडी कढई तुझ्या व नगरीच्या मध्ये ठेव. ही कढई म्हणजे तुला व नगरीला विभागणारी भिंतच होय, ह्या रीतीने तू त्या नगरीच्या विरुद्व आहेस हे दाखव. तू त्या नगरीला वेढा घालून हल्ला करशील. का? कारण हे इस्राएलच्या लोकांसाठी प्रतीक वा खूण असेल. ह्यावरुन मी (देव) यरुशलेमवर हल्ला करणार असल्याचे स्पष्ट होईल.

Cross references

लेवीय 2:5

जर तुला तव्यावर भाजलेल्या भाकरीचे अन्नार्पण करावयाचे असेल तर ते तेलात मळलेल्या बेखमीर मैद्याचे असावे.

यशया 8:18

“माझी मुले आणि मी इस्राएल लोकांकरिता निशाणी आणि पुरावे आहोत. सीयोनच्या डोंगरावर राहणाऱ्या सर्वशक्तिमान परमेश्वराने आम्हाला पाठविले आहे.”

यशया 20:3

तेव्हा परमेश्वर म्हणाला, “यशया तीन वर्षे उघडा व अनवाणी फिरला. हा मिसर व कूशयाला संकेत आहे.

यशया 22:7

तुझ्या खास दरीत सैन्यांची गाठ पडेल. रथांनी दरी भरून जाईल. घोडदळ शहराच्या वेशीपाशी ठेवले जाईल.

यिर्मया 39:1

अशा रितीने यरुशलेमचा पाडाव झाला. यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले संपूर्ण सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला. नगरीचा पाडाव करण्यासाठी त्याने नगरीला वेढा घातला.

यहेज्केल 12:6

रात्री सामान पाठीवर टाकून चालू लाग. तू कोठे जात आहेस हे दिसू नये म्हणून तोंड झाकून घे. लोक पाहू शकतील अशाच तऱ्हेने तू या गोष्टी केल्या पाहिजेस. का? कारण मी तुझा उपयोग करुन (तुझ्याकडून) इस्राएलच्या लोकांपुढे एक उदाहरण घालून देत आहे.”

यहेज्केल 12:11

त्यांना सांग, ‘मी (यहेज्केल) तुम्हा लोकांसाठी एक उदाहरण आहे. मी केलेल्या सर्व गोष्टी खरे, म्हणजे तुमच्याबाबतीत घडणार आहेत.’ तुम्हाला खरोखरच कैदी म्हणून दूरच्या देशांत जाणे भाग पडेल.

यहेज्केल 24:24

यहेज्केल, हे तुमच्यापुढे एक उदाहरण आहे. त्याने केले तेच तुम्ही कराल. शिक्षेची वेळ येईल. मगच तुम्हाला मी परमेश्वर आहे हे कळेल.”

यहेज्केल 24:27

त्या वेळी, तू त्या माणसाशी बोलू शकशील. तू अजिबात गप्प बसणार नाहीस. अशा रीतीने, तू त्यांना एक उदाहरण ठरशील मगच त्यांना मी देव आहे हे समजेल.”

लूक 2:34

मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला, तो येशूची आई मरीया हिला म्हणाला, “इस्राएलात, हे मूल, अनेकांचे पडणे व उठणे यांस कारणीभूत ठरेल. जे चिन्ह नाकारले जाईल ते होण्याकरिता याची नेमणूक झाली आहे.

इब्री लोकांस 2:4

देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भुत कृत्यांद्वारे, आणि तिरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.

Interlinear

Choose Theme