Home Bibles यहेज्केल 17:7 · मराठी बायबल
यहेज्केल 17:7 · मराठी बायबल

मग मोठे पंख असलेल्या, दुसऱ्या मोठ्या गरुडाने हा वेल पाहिला. त्या गरुडला खूप पिसे होती. ह्या नव्या गरुडाने आपली काळजी घ्यावी, असे द्राक्षवेलीला वाटत होते. म्हणून तिने आपली मुळे गरुडाकडे वळविली. तिच्या फांद्या त्याच्या दिशेने पसरल्या. ज्या मळ्यात ती वेल लावली होती, त्या मळ्यापासून फांद्या वाढून दूर गेल्या. नव्या गरुडाने आपल्याला पाणी द्यावे असे द्राक्षवेलीला वाटले.

Cross references

2 इतिहास 26:13

शत्रूवर तुटून पडणाऱ्या 307,500 वीरांच्या सैन्याचे ते प्रमुख होते. राजाच्या बाजूने ते शत्रूवर चालून जात.

यिर्मया 37:5

नेमके ह्याच वेळी मिसर देशातून फारोचे सैन्य यहूदाकडे आले. यरुशलेम जिंकून घेण्यासाठी खास्द्यांच्या सैन्याने त्या नगरीला वेढा घातला होता. त्यांच्यावर मिसरचे सैन्य चालून येत आहे हे त्याने ऐकले. म्हणून मिसरच्या सैन्याशी दोन हात करण्यासाठी खास्द्याच्या सैन्याने यरुशलेम सोडले.

यहेज्केल 17:15

पण शेवटी कसेही करुन ह्या नव्या राजाने नबुखद्नेस्सराविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केलाच. त्याने आपले दूत पाठवून मिसरकडे मदत मागितली त्यांना पुष्कळ घोडे व सैनिक मागितले. यहूदाचा नवा राजा ह्यात यशस्वी होईल, असे तुम्हाला वाटते का? नव्या राजाकडे करार मोडून शिक्षेतून सुटका करुन घेण्याइतके सामर्थ्य आहे, असे तुम्हाला वाटते का?”

यहेज्केल 31:4

पाण्यामुळे वृक्ष वाढला. नदीमुळे तो उंच झाला. वृक्षाभोवती नद्या वाहत होत्या. त्याच्यापासून निघणारे फक्त लहान पाटच मळ्यातील इतर झाडांपर्यंत जात.

Interlinear

Choose Theme