नेमके ह्याच वेळी मिसर देशातून फारोचे सैन्य यहूदाकडे आले. यरुशलेम जिंकून घेण्यासाठी खास्द्यांच्या सैन्याने त्या नगरीला वेढा घातला होता. त्यांच्यावर मिसरचे सैन्य चालून येत आहे हे त्याने ऐकले. म्हणून मिसरच्या सैन्याशी दोन हात करण्यासाठी खास्द्याच्या सैन्याने यरुशलेम सोडले.
Cross references
मिसरच्या नदीपासून फरात नदीपर्यंत पूर्वी मिसरच्या ताब्यात असलेला सगळा प्रदेश बाबेलच्या राजाने बळकावल्यामुळे मिसरचा राजा मिसरसोडून आला नाही.
मी यहूदाचा राजा सिद्कीया व तेथील नेते ह्यांना त्यांच्या शत्रूंच्या अथवा त्यांना मारु इच्छिणाऱ्या लोकांच्या स्वाधीन करीन. जरी बाबेलच्या सैन्याने यरुशलेम सोडलेअसले, तरी मी सिद्कीया आणि त्याच्या लोकांना बाबेलच्या राजाच्या सैन्याच्या हवाली करीन.
“परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव असे म्हणतो, ‘यहूकल व सफन्या, यहूदाचा राजा सिद्कीया याने तुम्हाला मला काही प्रश्न विचारण्यासाठी माझ्याकडे पाठविले आहे, हे मला माहीत आहे. सिद्कीयाला सांगा की बाबेलच्या सैन्यापासून तुम्हाला वाचविण्यासाठी फारोचे सैन्य मिसरमधून निघाले आहे. पण त्या सैन्याला मिसरला परत जावे लागेल.
जेव्हा खास्द्यांच्या सैन्याने, मिसरचा राजा फारो याच्या सैन्याबरोबर युद्ध करण्यासाठी, यरुशलेम सोडले,
पण शेवटी कसेही करुन ह्या नव्या राजाने नबुखद्नेस्सराविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केलाच. त्याने आपले दूत पाठवून मिसरकडे मदत मागितली त्यांना पुष्कळ घोडे व सैनिक मागितले. यहूदाचा नवा राजा ह्यात यशस्वी होईल, असे तुम्हाला वाटते का? नव्या राजाकडे करार मोडून शिक्षेतून सुटका करुन घेण्याइतके सामर्थ्य आहे, असे तुम्हाला वाटते का?”