“मानवपुत्रा, माझा त्याग करणाऱ्या आणि पाप करणाऱ्या राष्ट्रांला मग ते राष्ट्र कोणतेही असो मी शिक्षा करीन. त्यांचा अन्न पुरवठा मी बंद करीन. मी कदाचित् देशात दुष्काळ पाडीन व लोक व प्राणी यांना देशातून बाहेर काढीन.
Cross references
आणि तो मनात फार दु:खी झाला; तेव्हा तो म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरुन नष्ट करीन; तसेच माणसे, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दु:ख होत आहे.”
मी तुम्हाला धान्याचा फार थोडा वाटा देईन; तेव्हा दहा स्त्रीया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हाला तोलून देतील; ती तुम्ही खाल तुमचे पोट भरणार नाही-तुम्ही भुकेलेच राहाल!
तेव्हा मी ही प्रार्थना केली:हे परमेश्वरा, तुझ्याकडे पाहायाची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकांच्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोचले आहेत.
माझे म्हणणे समजून घ्या. यहुदा व यरूशलेम ज्यावर अवलंबून आहेत अशा सर्व गोष्टी तो प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर काढून घेईल. देव त्यांची भाकरी व पाणी बंद करील.
पृथ्वीला पापांचा भार झाला आहे. म्हणून ती त्या ओझ्याखाली दबून जाईल. पृथ्वी एखाद्या खिळखिळ्या झालेल्या घरासारखी उगमगेल. एखाद्या मद्यप्याप्रमाणे कोसळेल आणि पुन्हा उठणार नाही.
म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी ह्या जागेवर माझा राग काढीन. मी माणसांना, प्राण्यांना, रानातील झाडांना आणि पिकांना शिक्षा करीन. माझा राग तप्त अग्नीप्रमाणे असेल. कोणीही तो विझवू शकणार नाही.”
ते लोक कदाचित् तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जाऊ?’ तेव्हा तू त्यांना माझा पुढील संदेश दे परमेश्वर म्हणतो,‘काही लोकांना मी मरणासाठी निवडले आहे, ते मरतीलच. काही लोकांची निवड मी लढाईत मरण्यासाठी केली आहे, त्यांना तसेच मरण येईल. काहीना मी उपासमारीने मरण्यासाठी निवडले आहे; ते अन्नावाचून मरतील. काहीची निवड मी देशोधडीला लावण्यासाठीच केली आहे; त्यांना परदेशात कैदी म्हणून पाठविले जाईल.’
तुम्ही लोक म्हणत आहात, ‘ही जमीन म्हणजे ओसाड वाळवंट आहे. तेथे कोणी मनुष्यप्राणी वा पशू नाहीत. बाबेलच्या सैन्याने या देशाचा पराभव केला.’ पण भविष्यकाळात, ह्या देशात लोक पुन्हा एकदा शेते खरेदी करतील.
यिर्मया, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला असेही सांग ‘परमेश्वर काय म्हणतो पाहा यहोयाकीम, तू तो पट जाळलास. तू म्हणालास “बाबेलचा राजा नक्की येईल आणि या देशाचा नाश करील असे यिर्मयाने का लिहिले? बाबेलचा राजा माणसे व पशू ह्या दोघांचाही नाश करील असे तो का म्हणाला?”
यरुशलेमने फार पाप केले. तिच्या पापांमुळेच ती भग्नावशेष उरली. लोकांनी पाहून चुकचुकावे असेच ते रूप होय. पूर्वी लोकांनी तिचा आदर केला. पण आता तेच तिचा तिरस्कार करतात. त्यानी तिची निर्भर्त्सना केली म्हमून ते आता तिची घृणा करतात. यरुशलेम आता कण्हत आहे. ती तोंड फिरविते.
“परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! मी दु:खी झाले आहे. माझे अंत:करण अस्वस्थ झाले आहे माझ्या मनात खळबळ उडाली आहे. असे होण्याचे कारण माझा हट्टी स्वभाव रस्त्यांवर माझी मुले तलवारीने मारण्यात आली. तर घरा घरांत प्रत्यक्ष मृत्यू होता.
उपासमारीने मरण्यापेक्षा तलवारीने मेलेले बरे! कारण उपासमार झालेले फारच दु:खी होते. ते व्याकुळ झाले होते. शेतामधून काहीच न मिळाल्यामुळे ते मेले.
पुढे देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, यरुशलेमच्या धान्य पुरवठ्याचा मी नाश करीत आहे. लोकांना खायला अगदी थोडी भाकरी मिळेल. धान्य पुरवठ्याबाबत त्यांना अत्यंत चिंता पडेल. त्यांना पिण्यालाही अगदी कमी पाणी मिळेल. ते पाणी पिताना घाबरतील.
मी तुझ्यावर उपासमारीची भयंकर वेळ आणीन, मी तुझा नाश करणाऱ्या गोष्टी तुझ्याकडे पाठवीन, हे मी तुला सांगितले होतेच. ती उपासमारीची वेळ पुन्हा पुन्हा यावी. मी तुझा धान्य पुरवठा बंद करीन हे मी तुला सांगितले होते.
देव म्हणाला, “इस्राएल आणि यहुदाच्या लोकांनी अनंत पापे केली आहेत, ह्या देशात सगळीकडे खून होत आहेत. ही नगरी अपरांधानी भरुन गेली आहे. का? कारण लोक मनाशीच म्हणतात, ‘देवाने ह्या देशाचा त्याग केला. आम्ही काय करीत आहोत, हे त्याला दिसू शकत नाही.’
देव म्हणाला, “किंवा मी कदाचित् त्या देशावर चढाई करण्यासाठी शत्रूसैन्य पाठवीन. ते सैनिक त्या देशाचा नाश करतील. मी तेथील सर्व माणसांना व प्राण्यांना देशाबाहेर हालवीन.
देव म्हणाला, “वा मी त्या देशात कदाचित् रोगराई पसरवीन. मी माझ्या क्रोधाचा त्यांच्यावर वर्षाव करीन. मी त्या देशातील सर्व लोकांचा व प्राण्यांचा मुक्काम तेथून हालवीन.
मग परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “यरुशलेमाची स्थिती किती वाईट होणार त्याचा विचार कर. शत्रू सैनिक, उपासमार, रोगराई आणि हिंस्र प्राणी या चारही शिक्षा मी त्यांना करीन. त्या देशातील सर्व माणसांना व प्राण्यांचा मी नाश करीन.
त्या लोकांनी खोट्या देवांसाठी माझा त्याग केला, म्हणून मी त्या देशाचा नाश करीन.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या
तेव्हा मानवपुत्रा, आता इस्राएलाच्या लोकांशी बोल ‘परमेश्वर, माझा देव पुढील गोष्टी सांगतो, असे साग: इस्राएलच्या लोकांनी माझी निंदा केली आणि माझ्याविरुद्ध कट रचले.
म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो: “मी अदोमला शिक्षा करीन. मी अदोमवासीयांचा व तेथील प्राण्यांचा नाश करीन. तेमानापासून ददानापर्यंत सर्व अदोम देशाचा मी नाश करीन. अदोमची माणसे लढाईत मारली जातील.
पण परमेश्वरा आम्ही पाप केले,आम्ही चुकीचे वागलो आम्ही दुष्कृत्ये केली. आम्ही तुझ्याकडे पाठ फिरविली, तुझ्या आज्ञा आणि न्याय निर्णय यांच्यापासून आम्ही दूर गेलो.
आम्ही आमच्या परमेश्वर देवाचे ऐकले नाही परमेशवराने त्याच्या सेवका मार्फत संदेष्ट्यांमार्फत आम्हाला नियम सांगितले पण आम्ही त्या नियमांचे पालन केले नाही.