Home Bibles यहेज्केल 14:21 · मराठी बायबल
यहेज्केल 14:21 · मराठी बायबल

मग परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “यरुशलेमाची स्थिती किती वाईट होणार त्याचा विचार कर. शत्रू सैनिक, उपासमार, रोगराई आणि हिंस्र प्राणी या चारही शिक्षा मी त्यांना करीन. त्या देशातील सर्व माणसांना व प्राण्यांचा मी नाश करीन.

Cross references

यशया 51:19

दोन-दोनच्या गटाने यरूशलेमवर संकटे आली चोरी आणि नुकसान, भूक आणि युध्द.तू संकटात असताना तुला कोणीही मदत केली नाही. कोणी तुझ्यावर दया केली नाही.

यिर्मया 15:2

ते लोक कदाचित् तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जाऊ?’ तेव्हा तू त्यांना माझा पुढील संदेश दे परमेश्वर म्हणतो,‘काही लोकांना मी मरणासाठी निवडले आहे, ते मरतीलच. काही लोकांची निवड मी लढाईत मरण्यासाठी केली आहे, त्यांना तसेच मरण येईल. काहीना मी उपासमारीने मरण्यासाठी निवडले आहे; ते अन्नावाचून मरतील. काहीची निवड मी देशोधडीला लावण्यासाठीच केली आहे; त्यांना परदेशात कैदी म्हणून पाठविले जाईल.’

यहेज्केल 5:12

तुमचे एक तृतीयांश लोक रोगराईने व उपासमारीने नगरातच मरतील. एक तृतीयांश नगराबाहरे लढाईत मरतील. आणि उरलेल्या एक तृतीयांश लोकांचा माझी तलवार, दूरवरच्या देशांपर्यंत पाठलाग करील. तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक त्यांना लढाईत ठार करतील. मगच माझा राग शांत होईल.

यहेज्केल 5:13

ह्यानंतरच तुमच्या लोकांवरचा माझा राग मावळेल. माझ्याशी ते अतिशय वाईट वागले, त्यामुळे त्यांना शिक्षा होत आहे, हे मला माहीत आहे. तसेच, ‘मीच परमेश्वर आहे व त्यांच्याबद्दलच्या अतीव प्रेमापोटीमी त्यांच्याशी बोललो हे त्यांना त्या वेळी समजेल.”

यहेज्केल 5:17

मी तुझ्यावर उपासमार आणि हिंस्त्र प्राणी पाठवीन आणि ते तुझ्या मुलांना मारतील हे मी तुला सांगितले होते. नगरात सगळीकडे रोगराई व मृत्यू थैमान घालेल आणि शत्रू सैनिकांना तुझ्याविरुद्व लढण्यासाठी आणीन, असे मी तुला बजावले होते. ह्या सर्व गोष्टी घडतील असे मी म्हणजेच परमेश्वराने तुला सांगितले होते आणि तसेच घडेल.”

यहेज्केल 6:11

नंतर परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “टाळ्या वाजवून आणि तुझे हातपाय आपटून इस्राएलच्या लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांविरुद्ध बोल. ते रोगराईने व उपासमारीने मरतील अशी त्यांना ताकीद दे. ते युद्धात कामी येतील, असे त्यांना सांग.

यहेज्केल 14:13

“मानवपुत्रा, माझा त्याग करणाऱ्या आणि पाप करणाऱ्या राष्ट्रांला मग ते राष्ट्र कोणतेही असो मी शिक्षा करीन. त्यांचा अन्न पुरवठा मी बंद करीन. मी कदाचित् देशात दुष्काळ पाडीन व लोक व प्राणी यांना देशातून बाहेर काढीन.

यहेज्केल 14:15

देव म्हणाला, “अथवा, कदाचित् मी हिंस्र प्राणी त्या देशात सोडीन आणि ते सर्व लोकांना ठार मारतील. त्या हिंस्र प्राण्यांमुळे कोणीही त्या देशामधून प्रवास करणार नाही.

यहेज्केल 14:17

देव म्हणाला, “किंवा मी कदाचित् त्या देशावर चढाई करण्यासाठी शत्रूसैन्य पाठवीन. ते सैनिक त्या देशाचा नाश करतील. मी तेथील सर्व माणसांना व प्राण्यांना देशाबाहेर हालवीन.

यहेज्केल 14:19

देव म्हणाला, “वा मी त्या देशात कदाचित् रोगराई पसरवीन. मी माझ्या क्रोधाचा त्यांच्यावर वर्षाव करीन. मी त्या देशातील सर्व लोकांचा व प्राण्यांचा मुक्काम तेथून हालवीन.

यहेज्केल 33:27

“तू त्यांना सांगितले पाहिजेस की परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “माझी शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की त्या नाश झालेल्या गावांत राहणारे लोक तलवारीने मारले जातील. जर एखादा शेतांत असेल. तर मी त्याला प्राण्याकडून मारीन व त्या प्राण्याचे तो भक्ष्य होईल. जर लोक गडात वा गुहेत लपले असतील, तर ते रोगराईने मरतील.

आमोस 4:6

“तुम्ही माझ्याकडे यावे म्हणून मी खूप प्रयत्न केले. मी तुम्हाला अन्न दिले नाही. तुमच्या कोणत्याही गावात अन्न नव्हते. पण तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

प्रकटीकरण 6:4

मी पाहिलेतेव्हा लाल रंग असलेला दुसरा घोडा निघाला. घोडेस्वारला पृथ्वीवरुन शांति काढून घेण्याचा अधिकार दिला होता. म्हणजेलोकांनी आपापसांत एकमेकाला ठार करावे. त्याला मोठी तरवार देण्यात आली होती.

Interlinear

Choose Theme