Home Bibles यहेज्केल 1:6 · मराठी बायबल
यहेज्केल 1:6 · मराठी बायबल

पण त्या प्रत्येक प्राण्याला चार तोंडे आणि चार पंख होते.

Cross references

निर्गम 25:20

त्या दूतांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत व त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत व त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.

1 राजे 6:24

हे दोन्ही करुब तंतोतंत एकाच आकाराचे, एकाच मोजमापाचे होते. त्यांना प्रत्येकी दोन पंख असून प्रत्येक पंख साडेसात फूट लांबीचा होता. पसलेल्या दोन्ही पंखांची रुंदी 15 फूट भरत होती. आणि प्रत्येक करुब पंधरा फूट लांबीचा होता.

यशया 6:2

देवदूत परमेश्वराभोवती उभे होते. प्रत्येक देवदूताला सहा पंख होते. त्यातील दोन पंखांनी ते चेहरा झाकीत. दोनने पाय झाकीत व उरलेल्या दोन पंखांनी उडत.

यहेज्केल 1:8

त्यांच्या पंखाखाली मानवी हात होते. ते चार प्राणी होते. त्या प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते.

यहेज्केल 1:15

मी प्राण्यांकडे पाहात होतो तेव्हा मला जमिनीला टेकलेली चार चाके दिसली. प्रत्येक प्राण्यासाठी एक चाक होते. सर्व चाके सारखीच दिसत होती. ती तेजस्वी वैदुर्यापासून केल्याप्रमाणे दिसत होती. एकात दुसरे चाक असल्याप्रमाणे ती दिसत होती.

यहेज्केल 10:10

ती चारही चाके सारखीच होती. चाकात चाक असल्याप्रमाणे ती दिसत होती.

यहेज्केल 10:14

प्रत्येक करुब दूताला चार तोंडे होती. पहिले करुबाचे तोंड, दुसरे माणसाचे तोंड, तिसरे सिंहाचे तोंड व चवथे गरुडाचे तोंड खबार कालव्याजवळच्या दृष्टान्तात मी पाहिलेले प्राणी म्हणजे करुब दूतच होते.मग करुब हवेत उडाले.

यहेज्केल 10:21

प्रत्येक प्राण्याला चार तोंड व चार पंख होते. पंखाखाली मानवी हाताप्रमाणे दिसणारा अवयव होता.

प्रकटीकरण 4:7

पहिला जिवंतप्राणी सिंहासारखा होता. दुसरा बैलासारखा होता. तिसऱ्याचा चेहरा मनुष्यासारखा होता. आणि चवथा उडत्या गरुडासारखाहोता.

Interlinear

Choose Theme