त्यांचे पाय सरळ होते. त्यांच्या पायांचे तळवे गाईच्या खुरांप्रमाणे होते. ते चकाकी दिलेल्या पितळेप्रमाणे चमकत होते.
Cross references
ज्या प्राण्यांचे खूर दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात त्यांचे मांस तुम्ही खावे.
ह्या नियमावरुन शुद्ध प्राणी व अशुद्ध प्राणी तसेच खाण्यास योग्य असे प्राणी व जे खाऊ नयेत असे प्राणी ह्यांच्यातील भेद तुम्हांस समजावा.
देवा, तू तुझ्या दूतांना वाऱ्यासारखे बनवलेस आणि तुझ्या सेवकांना78 अग्रीसारखे.
ते प्राणी असे दिसत होते: प्राण्यांच्या मध्थेन काहीतरी जळत्या निखाऱ्याप्रमाणे होते. लहान लहान मशाली प्राण्यांमधून आणि त्यांच्या सभोवती फिराव्या तसा तो अग्नी दिसत होता. तो प्रकाश झगझगीतपणे चमकत होता आणि त्यातून वीज चमकत होती.
त्याचा देह चकचकीत दगडासारखा होता. त्याचा चेहरा विद्युतलतेप्रमाणे चमकत होता त्याचे हात व पाय चमक दिलेल्या पितळाप्रमाणे होते. त्याचा आवाज लोकांच्या कोलहलाप्रमाणे मोठा होता.
त्याचे पाय भट्टीत गरम झाल्यानंतर चमकणाऱ्या पितळासारखे होते. त्याचा आवाज पुराचे पाणी जसा आवाज करतेतसा होता.