Home Bibles निर्गम 13:4 · मराठी बायबल
निर्गम 13:4 · मराठी बायबल

आज अबीब महिन्यात तुम्ही मिसर सोडून निघत आहात.

Cross references

उत्पत्ति 15:16

मग चार पिढ्यानंतर तुझे लोक या देशात माघारे येतील. त्यावेळी ते येथे राहाणाऱ्या अमोरी लोकांचा पराभव करतील, अमोरी लोकांना शिक्षा करण्यासाठी मी तुझ्या लोकांचा उपयोग करीन. (हे काही काळानंतर घडेल कारण अमोरी लोकांचा दुष्टपणा अद्याप शिगेला पोहोंचला नाहीं.)”

निर्गम 6:4

त्यांच्याशी पवित्र करार करून मी त्यांना कनान देश देण्याचे वचन दिले. ते त्या देशात राहिले परंतु तो देश त्यांचा स्वत:चा नव्हता; ते तेथे उपरे होते.

निर्गम 12:2

“हा तुमच्या वर्षाचा पहिला महिना असे.

निर्गम 23:15

पहिली सुट्टी बेखमीर भाकरीच्या सणाची होय. मी आधी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही हा सण पाळावा; त्यात सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; या सणाच्या वेळी प्रत्येक माणसाने माझ्यासाठी अर्पण आणावे.

निर्गम 34:18

“बेखमीर भाकरीचा सण पाळ, मी पूर्वी दिलेल्या आज्ञेप्रमाणे नेमलेल्या वेळी अबीब महिन्यातील सात दिवस पर्यत तुम्ही बेखमीर भाकर खावी कारण ह्याच महिन्यात मिसर देशातून तुम्ही बाहेर आलात.

अनुवाद 16:1

“अबीब महिन्यात लक्षात ठेवून तुमचा देव परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण हा सण साजरा करा. कारण याच महिन्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला रात्रीच्या वेळी मिसरमधून बाहेर काढले.

Interlinear

Choose Theme