Home Bibles गणना 7:1 · मराठी बायबल
गणना 7:1 · मराठी बायबल

मोशेने पवित्र निवास मंडप उभा करण्याचे काम संपविले व त्याच दिवशी परमेश्वराला तो समर्पित केला. त्याने पवित्र निवास मंडप, त्यातील सर्व सामान तसेच वेदी व तिच्या सोबत वापरावयाची उपकरणे ही सर्व तेलाच्या अभिषेकाने पवित्र केली. त्यावरुन त्या वस्तू फकत परमेश्वराच्या उपासनेकरिताच वापरावयाच्या आहेत हे दिसले.

Cross references

उत्पत्ति 2:3

देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला व विशेष ठरविला कारण त्या दिवशी जग निर्माण करताना त्याने केलेल्या सर्व कामापासून विसावा घेतला.

निर्गम 13:2

“इस्राएलाचा प्रत्येक प्रथम जन्मलेला म्हणजे मातेच्या उदरातून बाहेर आलेला मुलगा, त्याच प्रमाणे पशूतला प्रथम जन्मलेला नर ह्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव. ते माझे आहेत.”

निर्गम 29:36

त्या सात दिवसात दर दिवशी एक गोज्या मारून अर्पण करावा. अहरोन व त्याच्या मुलांनी केलेल्या पापांच्या प्रायश्चितासाठी-भरपाईसाठी हा होम होय, वेदी शुद्ध करण्यासाठी तिच्यावर जैतुनाचे तेल ओतावे

निर्गम 30:23

“उत्तमात उत्तम मसाले घे; अधिकृत मापाप्रमाणे बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे सहा पौंड म्हणजेच अडीचशे शेकेल सुंगधी दालचिनी, बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल सुंगधी बच.

निर्गम 30:29

त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमेश्वराला परमपवित्र होतील; ज्याचा त्यांना स्पर्श होईल ते पवित्र होईल.

निर्गम 40:9

अभिषेकाचे तेल घेऊन पवित्र निवास मंडपाला व त्यातल्या सर्व वस्तूंना अभिषेक कर व त्याचे सर्व सामान पवित्र कर म्हणजे तो पवित्र होईल.

निर्गम 40:11

गंगाळ व त्याच्या खालची बैठक ह्यांस अभिषेक कर व त्यांना पवित्र कर.

निर्गम 40:17

योग्य वेळी म्हणजे दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवास मंडपाची उभारणी झाली.

लेवीय 8:10

मग मोशेने अभिषेकाचे तेल घेतले आणि पवित्र निवास मंडपावर व त्यातील सर्व वस्तूंवर ते शिंपडून त्यांना पवित्र केले.

लेवीय 9:1

आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे तसेच इस्राएलांचे वडील ह्यांना (पुढाऱ्यांना) बोलावले.

गणना 7:84

मोशेने वेदीला तेलाने अभिषेक करुन तिचे समर्पण करण्याच्या वेळी इस्राएल लोकांच्या प्रमुखांनी ही अर्पणे आणिली: चांदीची बारा ताटे, चांदीचे बारा कटोरे, सोन्याची बारा धूपपात्रे.

गणना 7:88

इस्राएलांच्या प्रमुखांनी शांत्यापर्णासाठीही पशू अर्पण केले. त्यांची एकूण संख्या, चोवीस गोऱ्हे, साठ मेंढे, साठ बकरे व एक एक वर्षाची साठ नर असलेली कोंकरे एवढी होती. मोशेने वेदीला तेलाचा अभिषेक केल्यावर त्यांनी अशा प्रकारे समर्पणे केली.

गणना 17:2

तशा बारा काठ्या घे. बारा वंश प्रमुखांकडून प्रत्येकी एक काठी घे. प्रत्येक माणसाचे नाव त्याच्या त्याच्या काठीवर लिही.

1 राजे 8:64

मंदिरा समोरचे अंगणही राजा शलमोनाने त्या दिवशी अर्पण केले. त्याने तेथे होम बली, धान्य आणि आधी शात्यार्पणासाठी अर्पण केलेल्या जनावरांची चरबी हे सर्व तेथे अर्पण केले. परमेश्वरापुढील पितळेची वेदी त्या मानाने लहान असल्यामुळे त्याने हे अंगणात केले.

मत्तय 23:19

तुम्ही आंधळे आहात. तुम्हांला काही दिसत नाही व कळत नाही! अर्पण मोठे की वेदी मोठी? वेदीमुळे अर्पण पवित्र होते म्हणून वेदी मोठी.

Interlinear

Choose Theme