असे झाले तर त्याच्या मालकाने त्याला देवासमोर अथवा न्यायधीशासमोर आणावे; त्याने त्याला दाराजवळ किंवा दरवाजाच्या लाकडी चौकटीजवळ न्यावे आणि अरीच्या अणकुचीदार टोकाने त्याचा कान टोचावा; मग तो गुलाम त्या मालकाची आयुष्यभर चाकरी करील.
Cross references
“आज रात्री मी मिसर देशभर फिरेन आणि त्यातील प्रथम जन्मलेल्या मुलांना व जनावरांतील नरांना मी मारून टाकीन, आणि मिसरमधील सर्व दैवतांना धडा शिकवून दाखवीन की मी परमेश्वर आहे.
तू लोकांमधून कर्तबगार देवाला भिणारे, व विश्वासू, पैसे खाऊन आपला निकाल बदलून अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकावर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम.
“दोघे जर मारामारी करीत असतील व त्यांचा धक्का एखाद्या गरोदर बाईला लागला आणि त्या बाईचा गर्भपात झाला पण तिला इतर कोणतीही इजा झाली नाही तर ज्याचा धक्का तिला लागला तिचा नवरा न्यायाधीशांच्या सल्ल्याने जो दंड ठरवील तो दंड त्याने द्यावा.
परंतु जर चोर सापडला नाही तर घरमालकाला देवासमोर किंवा न्यायाधीशसमोर न्यावे म्हणजे मग त्याने स्वत:च त्या वस्तू चोरल्याचा दोष त्याच्यावर येतो की काय याचा न्याय, देव किंवा न्यायाधीश करील.
“तुम्ही आपल्या देवाला किंवा लोकनायकांना शाप देऊ नये.
“जमीन खरोखर माझी आहे; म्हणून ती तुम्हाला कायमची विकता येणार नाही; तुम्ही परके व उपरी म्हणून माझ्या आश्रयाला आला आहा;
योबेल वर्षापर्यंत त्याने मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्यापाशी राहावे व तुझी सेवाचाकरी करावी.
मोशे इस्राएलच्या न्यायधिशांना म्हणाला, “तुमच्यापैकी प्रत्येकाने अशा कुटुंब प्रमुखाला शोधले पाहिजे की ज्याने लोकांना बआलपौरट्ठ्या खोट्या देवताची उपासना करायला भाग पाडले. नंतर तुम्ही त्या माणसांना मारून टाका.”
“या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करु नका. मग तो वाद दोन इस्राएलींमधला असो की एक इस्राएली व एक उपरा यांच्यातील असो. नीतीने न्याय करा.
तेव्हा दरवाजा जवळ धरुन आरीने त्याचा कान टोचा. तो तुमचा कायमचा दास आहे हे त्यावरुन कळेल. दासीच्या बाबतीतही असेच करा.
“तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेल्या नगरांमध्ये आपापल्या वंशाप्रमाणे न्यायाधीश व अधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात. या व्यक्तींनी नीतीने न्यायदान करावे.
“तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘यांचे म्हणणे ठिकच आहे.
हन्ना मात्र गेली नाही. ती म्हणाली, “मुलगा जेवण खाऊ शकेल इतपत मोठा झाला की मी त्याला शिलोला घेऊन जाईन. त्याला परमेश्वराला वाहीन. तो नाजीर होईल. मग तो तिथेच राहील.”
शमुवेल खूप म्हतारा झाला तेव्हा त्याने आपल्या मुलांना इस्राएलचे न्यायाधिश म्हणून नेमले.
दावीदाने आखीशचा विश्वास संपादन केला. आखीश मनात म्हणाला, “इस्राएलचे लोक आता दावीदचा द्वेष करतात. त्याच्याशी त्यांचा उभा दावा आहे. तेव्हा दावीद आता चिरकाल माझीच सेवा करील.”
दावीद म्हणाला, “निश्चितच माझी कामगिरी पाहालच तुम्ही.” आखीश म्हणाला, “उत्तम. मी तुला माझा अंगरक्षक म्हणून नेमतो. तू माझ्या संरक्षणाची काळजी घेशील.”
यावर ही वयोवृध्द मंडळी म्हणाली, “तू आज यांचा सेवक बनलास तर तेही तुझी सेवा करतील. त्यांच्याशी प्रेमाने, समजुतीने बोललास तर तेही आयुष्यभर तुझे काम करतील.”
परमेश्वरा, हे समजून घ्यायला तू मला मदत केलीस.तुला बळी किंवा धान्याच्या भेटी नको असतात. होमार्पणे किंवा पापार्पणे तुला नको असतात.
सुरूवातीला होते त्याप्रमाणे मी न्यायाधीश नेमीन. पूर्वीप्रमाणेच मंत्री नेमीन मग तुला सर्वजण ‘चांगली व निष्ठावंत नगरी म्हणतील.”‘
यरुशलेममधील नेते गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. तिचे न्यायाधीश संध्याकाळी मेंढ्यांवर हल्ला करुन, सकाळी आपल्या भक्ष्याची काहीही नामोनिशाणी न ठेवणाऱ्या भुकेल्या लांडग्याप्रमाणे आहेत.