Home Bibles 1 शमुवेल 28:2 · मराठी बायबल
1 शमुवेल 28:2 · मराठी बायबल

दावीद म्हणाला, “निश्चितच माझी कामगिरी पाहालच तुम्ही.” आखीश म्हणाला, “उत्तम. मी तुला माझा अंगरक्षक म्हणून नेमतो. तू माझ्या संरक्षणाची काळजी घेशील.”

Cross references

1 शमुवेल 27:10

हे दावीदाने अनेकदा केले. कोणत्या लढाईवरुन ही लूट आणली असे आखीशने दरवेळी विचारल्यावर दावीद प्रत्येक वेळी सांगत असे, “यहूदाच्या दक्षिण भागावर हल्ला केला.” किंवा “यहरमेलीच्या दक्षिण प्रांतात लढाई केली” किंवा “केनीच्या दक्षिण प्रदेशावर चढाई केली”

2 शमुवेल 16:16

दावीदाचा मित्र अकर् हूशय अबशालोमकडे आला आणि त्याने अबशालोमची स्तुती केली. तो म्हणाला, “राजा चिरायु होवो, राजा चिरायु होवो”

2 शमुवेल 16:19

पूर्वी मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो. आता त्यांच्या मुलाची सेवा केली पाहिजे. मी तुमची सेवा करीन.”

रोमकरांस 12:9

तुमची प्रीति प्रामाणिक असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा व बऱ्याला चिकटून राहा.

Interlinear

Choose Theme