तू माझा हा निरोप इस्राएल लोकांना सांग, ‘तुम्ही पुरुष व स्त्रिया यांनी आपल्या मिसरच्या रहिवासी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून सोन्याचांदीच्या वस्तू मागून घ्याव्यात.
Cross references
तेव्हा अशा रीतीने देवाने तुमच्या बापाच्या कळपातून जनावरे काढ्न घेऊन ती मला दिलेली आहेत.
आणि मिसरचे लोक तुम्हा इस्राएल लोकांवर दया करतील असे मी करीन. तेव्हा तुम्ही निघताना मिसरचे लोक तुम्हाला पुष्कळ बक्षिसे व भेट वस्तु देतील.
प्रत्येक इब्री स्त्री म्हणजे इस्राएली स्त्री आपल्या मिसरमधील शेजारणीकडून व आपल्या घरात राहाणाऱ्या मिसरच्या स्त्रीकडून भेट वस्तू मागून घेईल व ते लोक तिला भेट वस्तू देतील; तुम्हा लोकांना सोन्याचांदीचे दागिने व उंची कपडे भेट म्हणून मिळतील. मिसरमधून निघताना त्या वस्तू तुम्ही आपल्या मुलांमुलीच्या अंगावर घालाल. अशा प्रकारे तुम्ही मिसरच्या लोकांची संपत्ती घ्याल.”
मोशे व अहरोन अद्याप मिसरमध्ये असताना परमेश्वर त्यांच्याशी बोलला. तोम्हणाला,
इस्राएल लोकांनी मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे आपल्या मिसरच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जाऊन भारी भारी कपडे. सोन्याचांदीचे दागदागिने मागून घेतले होते.
अहरोन लोकांना म्हणाला, “तुम्ही तुमच्या बायका मुले व मुली यांच्या कानातील सोन्याची कुंडले मजकडे आणा.”
तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘जर तुम्हाकडे सोन्याची कुंडले असतील तर ती मला द्या.’ तेव्हा लोकांनी मला त्यांच्याकडील सोने दिले; मी सोने भट्टीत टाकले आणि तिच्यातून हे वासरु बाहेर आले!”
ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळया स्त्री पुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगड्या असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली.
दुष्ट माणसाला इतकी चांदी मिळेल की ती त्याला मातीमोल वाटेल, त्याला इतके कपडे मिळतील की ते त्याला मातीच्या ढिगाप्रमाणे वाटतील.
पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत.
नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले. त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली. देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही.
चांगल्या माणसाकडे त्याच्या मुलांना आणि नातवंडांना द्यायला संपत्ती असेल. आणि शेवटी चांगल्या माणसाला दुष्ट लोकांकडचे सर्व काही मिळेल.
मीतुला उत्तम वस्त्रे व मऊ चामड्याचे जोडे दिले. तुझ्या डोक्याला तागाचा पट्टा गुंडाळला व तुला रेशमी ओढणी पांघरली.
त्यांच्याकडील सर्व सोने-चांदी माझ्या मालकीची आहे सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे.
मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’