Home Bibles उपदेशक 7:29 · मराठी बायबल
उपदेशक 7:29 · मराठी बायबल

“मी आणखी एक गोष्ट शिकलो. देवाने माणसाला चांगले बनवले. पण माणसांनीच वाईट होण्याचे अनेक मार्ग शोधून काढले.”

Cross references

उत्पत्ति 1:26

मग देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करु; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील.”

उत्पत्ति 3:6

स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर, त्याचे फळ खाण्यास चांगले व शहाणपण देणारे आहे म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले व खाल्ले. तिचा नवरा तिच्याबरोबर तेथे होता; तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडे दिले व त्याने ते खाल्ले.

उत्पत्ति 5:1

आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य आपल्या प्रतिरुपाचा म्हणजे आपल्या सारखा निर्माण केला.

उत्पत्ति 6:5

परमेश्वराने पाहिले की पृथ्वीवरील लोक दुष्ट आहेत; त्यांचे विचार नेहमी वाईट असतात.

उत्पत्ति 6:11

देवाने पृथ्वीकडे पाहिले तेव्हा माणसांनी ती भ्रष्ट केली आहे असे त्याला आढळले.

उत्पत्ति 11:4

मग लोक म्हाणाले, “चला, आपण आपणासाठी नगर बांधू; आणि आकाशाला भिडणारा उंचच उंच बुरुज बांधू; असे केले तर मग आपण नावाजलेले लोक होऊ व आपण पांगले जाणार नाहीं तर एके जागी एकत्र राहू.”

स्तोत्रसंहिता 99:8

परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस, तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.

स्तोत्रसंहिता 106:29

देव त्याच्या माणसांवर खूप रागावला, देवाने त्यांना खूप आजारी पाडले.

स्तोत्रसंहिता 106:39

म्हणून देवाची माणसे त्या इतर माणसांबरोबर अमंगल झाली. देवाची माणसे त्यांच्या देवाशी प्रामाणिक राहिली नाहीत आणि इतर लोकांनी जी कृत्ये केली तीच त्यांनीही केली.

यिर्मया 2:12

“आकाशा, घडलेल्या गोष्टीबद्दल तुला आश्र्चर्याचा धक्का बसू दे. भीतीने थरथर काप.” हा परमेश्वराचा संदेश होता.

यिर्मया 4:22

देव म्हणतो, “माझे लोक मूर्ख आहेत. ते मला ओळखत नाहीत. ती मूर्ख मुले आहेत त्यांना समजत नाही. दुष्कृत्ये करण्यात ते पटाईत आहेत पण सत्कृत्ये कशी करावी त्यांना माहीत नाही.”

यहेज्केल 22:6

“पाहा! यरुशलेममध्ये, प्रत्येक राज्यकर्ता दुसऱ्याला ठार करण्याइतका सामर्थ्यशाली झाला.

यहेज्केल 28:15

मी तुला निर्मिले, तेव्हा तू सज्जन व प्रामाणिक होतास. पण नंतर तू दुष्ट झालास.

मार्क 7:8

तुम्ही देवाच्या आज्ञा पाळत नाही, तर आता तुम्ही मनुष्याची शिकवण पाळता आहात.”

प्रेषितांचीं कृत्यें 7:40

आपले वाडवडील अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर. कारण इजिप्त देशातून काढून आम्हांला बाहेर घेऊन येणारा हा मोशे, त्याचे काय झाले हे आम्हांला माहीत नाही’.

रोमकरांस 1:21

कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंत;करणे अंधकारमय झाली.

रोमकरांस 3:9

तर मग काय? आम्ही यहूदी, विदेशी लोकांपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहोत काय? मुळीच नाही! कारण यहूदी आणि ग्रीक हे सारखेच पापाच्या अधिकाराखाली आहेत.

इफिसकरांस 2:2

ज्यामध्ये तुम्ही पूर्वी जगत होता, जगातील दुष्ट मार्गाचे अनुकरण करीत होता, आणि आपल्याला न दिसणारे आध्यात्मिक सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्या सताधीशाचे अनुकरण करीत होता. जे देवाच्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये हाच आत्मा कार्य करीत आहे.

तीताला 3:3

मी हे सांगतो कारण आपणसुद्धा एके काळी मूर्ख, आज्ञा न पाळणारे आणि बहकलेले असे होतो. आम्ही सर्व प्रकारच्या वासनांची व विलासाची गुलामाप्रमाणे सेवा करणारे होतो. आम्ही दुष्टतेचे व हेव्यादाव्याचे जीवन जगत होतो. इतर लोक आमचा द्वेष करीत. आणि आम्ही एकमेकांचा द्वेष करीत होतो.

Interlinear

Choose Theme