Home Bibles रोमकरांस 3:9 · मराठी बायबल
रोमकरांस 3:9 · मराठी बायबल

तर मग काय? आम्ही यहूदी, विदेशी लोकांपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहोत काय? मुळीच नाही! कारण यहूदी आणि ग्रीक हे सारखेच पापाच्या अधिकाराखाली आहेत.

Cross references

यशया 65:5

“पण हे लोक दुसऱ्या लोकांना सांगतात, ‘माझ्याजवळ येऊ नकोस. मी तुला शुध्द केल्याशिवाय मला शिवू नकोस.’ ते लोक माझ्या डोळ्यांत जाणाऱ्या धुराप्रमाणे आहेत. त्यांचा अग्नी सतत जळत असतो.”

लूक 7:39

ज्या परुश्याने हे आमंत्रण दिले होते त्याने ते पाहिले आणि तो स्वत:शी म्हणाला, “जर हा मनुष्य संदेष्टा असता, तर ही कोण व कशा प्रकारची स्त्री आपल्या पायाला स्पर्श करीत आहे, हे त्याला कळले असते!”

लूक 18:9

अशा लोकांना जे स्वत:नीतिमान असल्याचा अभिमान बाळगत होते व इतरांना कमी लेखत होते, अशा लोकांसाठी येशूने ही गोष्ट सांगितली.

रोमकरांस 1:18

लोकांनी केलेल्या प्रत्येक अनितीच्या कृत्यांमुळे व जे आपल्या अनीतीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्यामुळे स्वर्गातून देवाचा क्रोध प्रगट होतो.

रोमकरांस 3:5

जर आपल्या दुष्टपणामुळे देवाचा न्याय स्पष्ट होत असेल तर त्याला काय म्हणावे? देव जो आपणावर क्रोध आणतो त्याला अनीतिमान म्हणावे काय? (मी हे मानवाप्रमाणे बोलतो).

रोमकरांस 3:19

आता आपणाला माहीत आहे की, नियमशास्त्र जे सांगते ते नियमशास्त्राच्या आधिन असणाऱ्यांकरिता आहे व मनुष्यांच्या कामचुकार पणाला आळा घालण्यासाठी व सर्व जगाला चांगले व पूर्ण होण्यासाठी आहे. त्या नियमशास्त्र प्रमाणे सर्व दोषी आहेत.

रोमकरांस 3:22

देवाची नीतिमत्त्वाची कृती ही येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आहे आणि जे विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी दाखविली आहे. त्यात भेदभाव नाही.

रोमकरांस 6:15

तर मग आपण काय करावे? आपण नियमशास्त्राधीन नसून देवाच्या कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय?

रोमकरांस 11:7

तर मग काय? इस्राएल लोक जे मिळविण्याचा प्रयत्न करीत होते ते त्यांना मिळाले नाही. परंतु जे निवडलेले त्यांना मिळाले आणि बाकीचे कठीण झाले.

रोमकरांस 11:32

कारण देवाने सर्व लोकांना आज्ञाभंगाच्या तरुंगात कोंडले आहे, यासाठी की, त्याने त्यांच्यावर दया करावी.

1 करिंथकरांस 4:7

कोण म्हणतो की तू दुसऱ्यापेक्षा चांगला आहेस? आणि तुझ्याजवळ असे काय आहे जे तुला मिळाले नाही? ज्याअर्थी तुला सर्व मिळाले आहे, तर तुला मिळाले नाही अशी बढाई का मारतोस?

1 करिंथकरांस 10:19

तर मी काय म्हणतो? माइया म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तिला वाहिलेले अन्र काहीतरी आहे किंवा ती मूर्ति काहीतरी आहे?

1 करिंथकरांस 14:15

मग काय केले पाहिजे? मी माझ्या आत्म्याने प्रार्थना करीन पण त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धिनेही प्रार्थना करीन.

गलतीकरांस 3:10

परंतु नियमशास्त्राच्या कृतीवर जे अवलंबून राहतात ते शापित आहेत. कारण शास्त्रात असेलिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेल्या सर्व गोष्टी करण्यात जो कोणी टिकून राहत नाही, तो शापितअसो.”

गलतीकरांस 3:22

पण पवित्र शास्त्रानेस्पष्ट केले आहे की, संपूर्ण जग ह पापाच्या सामर्थ्याने जखडून टाकले होते, यासाठी की, जे अभिवचन देण्यात आले होते तेजे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यांना देण्यात यावे.

फिलिप्पैकरांस 1:18

पण त्यामुळे काय होते? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, प्रत्येक मार्गाने चांगला हेतू असो की वाईट हेतू असो, ख्रिस्त गाजविला जातो. आणि त्यामुळे मला आनंद होतो. आणि मला आनंद होतच राहील.

Interlinear

Choose Theme