Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 7:10 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 7:10 · मराठी बायबल

योसेफावर तेथे खूप संकटे आली पण देवाने त्याला सर्व संकटांतून सोडविले, देवाने योसेफाला ज्ञान व शहाणपण दिले. त्यामुळे इजिप्तचा राजा, फारो, याची मर्जी योसेफाला संपादन करता आली. फारोने योसेफाला इजिप्त देशावर व त्याच्या घरावर अधिपती म्हणून नेमले.

Cross references

उत्पत्ति 41:12

तेथे कोणी इब्री तरुण आमच्या बरोबर कैदेत होता. तो गारदद्यांच्या सरदाराचा दास होता. त्याला आम्ही आमची स्वप्ने सांगितली त्याने त्यांचे स्पष्टीकरण केले आणि त्याने आमच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला व उलगडा केला.

उत्पत्ति 42:6

त्या वेळी योसेफ मिसरचा प्रशासक म्हणजे प्रमुख अधिकारी होता. बाहरेच्या देशातून धान्य विकत घ्यावयास मिसरमध्ये येणाऱ्या लोकांना धान्य विकण्याचा अधिकार केवळ योसेफालाच होता; म्हणून योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आणि त्यांनी त्याला लवून नमन केले.

उत्पत्ति 44:18

मग यहूदा योसेफाकडे जाऊन म्हणाला, “कृपा करुन माझ्यावर रागावू नका परंतु अगदी खरेपणाने व मोकळेपणाने मला आपल्याबरोबर बोलू द्या. आपण फारो राजासमान असून इतके अधिकार आपणाला आहेत हे मी जाणतो.

उत्पत्ति 45:8

मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या बापासमान केले आहे; त्यामुळे मी फारोच्या घरदाराचा स्वामी आणि सर्व मिसर देशाचा प्रशासक झालो आहे.”

उत्पत्ति 48:16

तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता. त्यानेच ह्या मुलांना आशीर्वाद द्यावा अशी मी प्रार्थना करतो. आता ही मुले माझे व आपले पूर्वज अब्राहाम व इसहाक यांचे नाव चालवोत; ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे, कुळे व राष्ट्रे होवोत अशी मी प्रार्थना करतो.”

स्तोत्रसंहिता 22:24

का? कारण परमेश्वर संकटात सापडलेल्या गरीब लोकांना मदत करतो. परमेश्वराला त्यांची लाज वाटत नाही. परमेश्वर त्यांचा तिरस्कार करत नाही. जर लोकांनी परमेश्वराला मदतीसाठी बोलावले तर तो त्यांच्यापासून लपून बसणार नाही.

स्तोत्रसंहिता 34:17

परमेश्वराची प्रार्थना करा, तो तुमचे ऐकेल. तो तुम्हाला तुमच्या सर्व संकटांतून वाचवेल.

स्तोत्रसंहिता 37:40

परमेश्वर चांगल्या माणसांना मदत करतो आणि त्यांना तारतो चांगले लोक परमेश्वरावर अवलंबून असतात आणि तो त्यांचे वाईट लोकांपासून रक्षण करतो.

स्तोत्रसंहिता 40:1

मी परमेश्वराला बोलावले आणि त्याने माझी हाक ऐकली. त्याने माझे ओरडणे ऐकले.

स्तोत्रसंहिता 105:19

योसेफाने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष घडेपर्यंत तो गुलामच राहिला. परमेश्वराच्या संदेशामुळे योसेफ बरोबर होता हे सिध्द झाले.

नीतिसूत्रे 2:6

परमेश्वर ज्ञान देतो. ज्ञान आणि समज त्याच्या मुखातून येते.

नीतिसूत्रे 3:4

म्हणजे तू शहाणा होशील व देवाला व लोकांना तुझ्याबद्दल आनंद वाटेल.

नीतिसूत्रे 16:7

जर एखादा माणूस चांगले आयुष्य जगत असेल, परमेश्वराला खुष करत असेल तर त्या माणसाचे शत्रूदेखील त्याच्याबरोबर शांतता राखतील.

यिर्मया 39:12

“यिर्मयाला शोधून काढा व त्याची काळजी घ्या. त्याला इजा करु नका. तो मागेल ते त्याला द्या.”

2 तीमथ्थाला 4:18

प्रभु माल सर्व दुष्कृत्यांपासून सोडवील व त्याच्या स्वर्गाच्या राज्यात सुखरूपपणे आणिल. त्याला सदासर्वकाळपर्यंत गौरव असो.

याकोब 5:11

त्यांनी दु:ख सहन केले म्हणून आपण त्यांना धन्य समजतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि तुम्हांला माहीत आहे की, प्रभूने ईयोबाच्या वतीने त्याचा शेवट कसा केला. प्रभु दयाळू आणि खूप कनवाळू आहे, ह्या गोष्टीचे त्याने प्रात्यक्षिक दाखविले.

प्रकटीकरण 7:14

मी म्हणालो, “महाराज, आपणाला माहीत आहे.”आणि तो वडील म्हणाला, “हे लोक मोठ्या त्रासातून बाहेर आलेले आहोत, त्यांनी त्यांची वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुतलीआहेत. आता स्वच्छ व शुभ्र झाले आहेत.

Interlinear

Choose Theme