Home Bibles अनुवाद 19:10 · मराठी बायबल
अनुवाद 19:10 · मराठी बायबल

आपल्या पोटच्या मुलाबाळांचा यज्ञाची वेदीवर बळी देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका.

Cross references

गणना 35:33

“तुमच्या प्रदेशाला निष्पाप रक्ताने भ्रष्ट करु नका जर एखाद्याने कुणाचा खून केला तर त्या अपराधासाठी असलेली एकमेव शिक्षा म्हणजे त्या खुन्याला ठार मारणे. त्याशिवाय त्याप्रदेशाची त्या अपराधपासून सुटका होऊच शकत नाही.

अनुवाद 4:21

“तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावर कोप झाला व त्याने निश्चयाने सांगितले की मी यार्देन नदीपलीकडे पाऊल ठेवू शकणार नाही. परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या ज्या सुपीक भूमीत तुम्ही प्रवेश करणार आहात, तेथे मला मज्जाव आहे.

अनुवाद 19:13

तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी विश्वासू असा.

अनुवाद 21:1

“तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात एखाद्याचा उघड्यावर खून झालेला आढळला आणि मारेकऱ्याचा पत्ता लागला नाही

अनुवाद 26:1

“लौकरच तुम्ही तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात पाऊल टाकून तेथील जमिनीचा ताबा घेऊन, तेथे राहाल.

1 राजे 2:31

तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्याला तिथेच ठार कर. मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय.

2 राजे 21:16

शिवाय मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. संपूर्ण यरुशलेम त्याने रक्तलांछित केले. यहूद्यांना त्याने जी पापे करायला लावली ती वेगळीच. परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते मनश्शेने यहूदाला करायला लावले.”‘

2 राजे 24:4

मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. सारे युरुशलेम त्यांच्या रक्ताने माखले. या पापांना परमेश्वराजवळ क्षमा नव्हती.

स्तोत्रसंहिता 94:21

ते न्यायाधीश चांगल्या माणसांवर हल्ला करतात. ते निरपराधी लोक अपराधी आहेत असे म्हणतात आणि त्यांना ठार मारतात.

नीतिसूत्रे 6:17

डोळे, जे माणूस गर्विष्ठ आहे हे दाखवतात. जीभ, जी खोटे बोलते, हात, जे निरपराध्यांना ठार मारतात.

यशया 59:7

आपल्या पायांचा उपयोग ते पापांकडे पळण्यासाठी करतात. निष्पाप लोकांना मारण्याची त्यांना घाई असते. ते दुष्ट विचार करतात. मारामारी आणि चोरी हेच त्यांच्या जगण्याचे मार्ग असतात.

यिर्मया 7:6

तुम्ही अपरिचिताशीसुध्दा प्रामाणिकपणे वागले पाहिजे. विधवांसाठी आणि अनाथांसाठी तुम्ही योग्य गोष्टी केल्या पाहिजेत. निरपराध्यांना मारु नका. दुसऱ्या देवांना अनुसरु नका. का? कारण ह्या गोष्टी तुमच्या आयुष्याचा नाश करतील.

योएल 3:19

मिसर उजाड होईल. अदोमाचे रान होईल. का? कारण ते यहूद्यांशी क्रूरपणे वागले. त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांना मारले

योना 1:14

म्हणून लोकांनी परमेश्वराची करूणा भाकली, “परमेश्वरा, त्याने केलेल्या वाईट कृत्याबद्दल आम्ही या माणसाला समुद्रात फेकत आहोत.’ असे कृपया म्हणू नकोस. तू परमेश्वर आहेस आणि तुझ्या इच्छेप्रमाणे तू करशील, हे आम्हाला माहीत आहे. पण कृपा करुन आमच्यावर दया कर.”

मत्तय 27:4

तो म्हणाला, “मी पाप केले आहे, मी एका निष्पाप मनुष्याला जिवे मारण्यासाठी तुमच्या हाती दिले.”यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हांला त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!”

Interlinear

Choose Theme