Home Bibles अनुवाद 4:21 · मराठी बायबल
अनुवाद 4:21 · मराठी बायबल

“तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावर कोप झाला व त्याने निश्चयाने सांगितले की मी यार्देन नदीपलीकडे पाऊल ठेवू शकणार नाही. परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या ज्या सुपीक भूमीत तुम्ही प्रवेश करणार आहात, तेथे मला मज्जाव आहे.

Cross references

गणना 20:12

पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनला म्हणाला, “इस्राएलचे सगळे लोक एकत्र जमले होते. पण तू मला मान दिला नाहीस. पाणी निर्माण करण्याची शक्ती माझ्यामुळे आली हे तू लोकांना दाखवले नाहीस. तुझा माझ्यावर विश्वास आहे हे तू लोकांना दाखवले नाहीस. मी वचन दिल्याप्रमाणे त्या लोकांना तो प्रदेश देईन. पण तू त्यांना तिथे घेऊन जाणार नाहीस.”

अनुवाद 1:37

“तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावरही कोप झाला. तो म्हणाला, ‘मोशे, तूही या प्रदेशात प्रवेश करणार नाहीस.

अनुवाद 3:26

“पण तुमच्यापायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला होता. त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, ‘पुरे, आता एक शब्दही बोलू नको.

अनुवाद 15:4

तुमच्या देशात कोणी गरीब असता कामा नये. कारण ही भूमी तुम्हाला परमेश्वराने दिली आहे आणि तो तुम्हाला भरभरुन आशीर्वाद देणार आहे

अनुवाद 19:3

“यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरु मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा.

अनुवाद 19:10

आपल्या पोटच्या मुलाबाळांचा यज्ञाची वेदीवर बळी देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका.

अनुवाद 20:16

“पण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशातील नगरे तुम्ही ताब्यात घ्याल तेव्हा तिथे मात्र कोणालाही जिवंत ठेवू नका.

अनुवाद 21:23

तेव्हा ते रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नका. त्याचदिवशी कटाक्षाने त्याचे दफन करा. कारण झाडाला टांगलेल्या त्या मृतदेहाला देवाचा शाप असतो. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेली भूमी अशी विटाळू नका.

अनुवाद 26:1

“लौकरच तुम्ही तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात पाऊल टाकून तेथील जमिनीचा ताबा घेऊन, तेथे राहाल.

अनुवाद 31:2

तो म्हणाला, “मी आता एकशेवीस वर्षाचा आहे. माझ्याने आता तुमचे नेतृत्व होत नाही. शिवाय ‘यार्देन नदीपलीकडे जायचे नाही असे,’ परमेश्वरानेही मला सांगितले आहे.

स्तोत्रसंहिता 106:32

मरीबा येथे लोक खूप रागावले आणि त्यांनी मोशेला काही तरी वाईट करायला लावले.

Interlinear

Choose Theme