Home Bibles योना 1:14 · मराठी बायबल
योना 1:14 · मराठी बायबल

म्हणून लोकांनी परमेश्वराची करूणा भाकली, “परमेश्वरा, त्याने केलेल्या वाईट कृत्याबद्दल आम्ही या माणसाला समुद्रात फेकत आहोत.’ असे कृपया म्हणू नकोस. तू परमेश्वर आहेस आणि तुझ्या इच्छेप्रमाणे तू करशील, हे आम्हाला माहीत आहे. पण कृपा करुन आमच्यावर दया कर.”

Cross references

उत्पत्ति 9:6

“देवाने माणूस आपल्या प्रतिरुपाचा उत्पन्न केला आहे. म्हणून जर एखादी व्यक्ति एखाद्या व्यक्तिद्वारे ठार मारली गेली तर ती व्यक्तिपण त्याच व्यक्तिद्वारेच ठार केली जाईल.

अनुवाद 21:8

आम्हाला तू आपलस केल आहेस. आमचा उद्धार केला आहेस. आम्हाला शुद्ध कर. एका निरपराध व्यक्तीच्या हत्त्येबद्दल आम्हाला दोषी धरु नकोस. असे केले असता त्या निरपराध व्यक्तीच्या हत्येचे पाप या लोकांना लागणार नाही.’

स्तोत्रसंहिता 107:28

ते संकटात सापडले म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटापासून वाचवले.

स्तोत्रसंहिता 115:3

देव स्वर्गात आहे आणि त्याला हवे ते तो करतो.

स्तोत्रसंहिता 135:6

परमेश्वर त्याला हवे ते पृथ्वीवर आणि स्वर्गात समुद्रात आणि खोल महासागरात करत असतो.

यशया 26:16

परमेश्वरा, संकटात असताना लोक तुझे स्मरण करतात. तू शिक्षा केल्यास लोक मनात तुझा धावा करतात.

दानीएल 4:34

ह्या काळाच्या अखेरीला मी नबुखद्नेस्सरने स्वर्गाकडे पाहिले आणि माझे मन ताव्व्यावर आले मग मी परात्पर देवाचे स्तवन केले. त्या चिरंतनाचा मी मान ठेवला त्याचे उपकार मानले.देवाचे प्रभुत्व अंखड आहे. त्याचे राज्य पिढ्यान्पिढ्या राहणारे आहे.

योना 1:5

गलबत बुडू नये म्हणून गलबतावरचे वजन कमी करावे असे गलबतावरील लोकांना वाटले. म्हणून त्यांनी गलबतावरील माल समुद्रात टाकण्यास सुरवात केली. खलाशी खूपच घाबरले होते. प्रत्येकजण आपापल्या दैवतांची प्रार्थना करु लागले. योना झोपण्यासाठी गलबताच्या खालच्या तळाच्या भागात गेला होता. तो तेथे झोपला होता.

योना 1:16

हे पाहताच ती माणसे परमेश्वराला घाबरु लागली व मान देऊ लागली. त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला आणि नवस केले.

मत्तय 11:26

होय पित्या, तू हे केलेस, कारण खरोखर तुला असेच करायचे होते.

प्रेषितांचीं कृत्यें 28:4

ते पाहून तेथील रहिवासी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे. समुद्रातून जरी हा वाचला असला तरी देवाच्या न्यायामुळे याचे आयुष्य संपुष्टातच आले आहे!”

इफिसकरांस 1:9

ख्रिस्तामध्ये आपणांला दाखविण्याच्या त्याच्या अनुग्रहाप्रमाणे त्याच्या इच्छेचे रहस्य आपल्याला कळविले.

इफिसकरांस 1:11

ख्रिस्तामध्ये आम्ही देवाचे लोक म्हणून निवडले गेलो होतो. यासाठी आम्ही अगोदरच निवडले गेलो होतो. देवाचा हेतू लक्षात घेऊन जो सर्व गोष्टी त्याच्या इच्छेच्या हेतूनुसार पूर्णत्वास नेतो

Interlinear

Choose Theme