Home Bibles दानीएल 4:19 · मराठी बायबल
दानीएल 4:19 · मराठी बायबल

मग काही काळापर्यंत दानीएल (म्हणजे बेल्टशस्सर) एकदम गप्प झाला. तो या गोष्टीचा त्याच्या मनात विचार करीत राहिला ते पाहून राजा म्हणाला,”बेल्टशस्सर (दानीएल) मला स्वप्नचा अर्थ सांगताना घाबरू नकोस. मग बेल्टशस्सर (दानीएल) राजाला म्हणाला,”हे स्वामी इडापिडा टळो! हे स्वप्न तुझ्या शत्रूंच्या संदर्भात असायला हवे होते. आणि त्या स्वप्नाचा अर्थ तुझ्या विरोधात असणाऱ्यांच्या संदर्भात असायला हवा होता.

Cross references

उत्पत्ति 31:35

आणि राहेल आपल्या बापाला म्हणाली, “बाबा, मी आपल्यासमोर उभी राहू शकत नाही म्हणून माझ्यावर रागावू नका, कारण माझा मासिक धर्म आला आहे.” अशी रीतीने लाबानाने तळाची कसून तपासाणी केली परंतु त्याला कुलदेवता सापडल्या नाहीत.

उत्पत्ति 32:4

त्याने त्यांना सांगितले “तुम्ही या सर्व गोष्टी माझे स्वामी एसाव त्यांना सांगा, ‘आपला सेवक याकोब असे म्हणतो की आजपर्यंत अनेक वर्षे मी लाबानाकडे राहिलो;

उत्पत्ति 32:18

तेव्हा तू त्याला असे उत्तर दे, ‘ही जनावरे आपला सेवक याकोब याच्या मालकीची आहेत. याकोबाने ही स्वामी आपल्याला भेट म्हणून पाठवली आहेत आणि याकोब आमच्या पाठोपाठ येत आहे.”

निर्गम 32:32

तरी आता तू त्यांच्या ह्या पापांची क्षमा कर! परंतु जर तू त्यांच्या पापांची क्षमा करणार नसशील तर मग तू लिहिलेल्या जीवनी पुस्तकातून माझे नांव काढून टाक.

1 शमुवेल 1:15

हन्ना म्हणाली, “महाशय, मी कोणतेही मद्य घेतलेले नाही. मी अतिशय त्रासलेली आहे. परमेश्वराला मी माझी सर्व गाऱ्हाणी सांगत होते.

1 शमुवेल 3:17

एली म्हणाला, “परमेश्वर तुझ्याशी काय बोलला?मोकळेपणाने सर्व सांग. काही लपवलेस तर परमेश्वर तुला शिक्षा करील.”

1 शमुवेल 24:8

दावीद गुहेतून बाहेर आला आणि त्याने शौलला साद घातली, “महाराज, माझे स्वामी!”शौलने मागे वळून पाहिले. दावीदाने मान लववून त्याला अभिवादन केले.

1 शमुवेल 26:15

दावीद म्हणाला, “तू मर्द आहेस ना? इस्राएल मध्ये तुझ्या तोडीचा दुसरा कोणी आहे का? मग तू आपल्या धन्याचे रक्षण कसे केले नाहीस? एक सामान्य माणूस तुमच्या छावणीत शिरतो, धन्याला, राजाला मारायला येतो.

2 शमुवेल 18:31

मग तो कूशी आला तो म्हणाला, “माझ्या स्वामीसाठी ही बातमी आहे. तुमच्या विरुद्ध पक्षाच्या लोकांना परमेश्वराने चांगली अद्दल घडवली.”

1 राजे 18:7

ओबद्याला वाटेत एलीया भेटला. ओबद्याने त्याला ओळखून अभिवादन केले. ओबद्या त्याला म्हणाला, “एलीया? स्वामी, खरोखर तुम्हीच आहात का?”

यिर्मया 4:19

अरे रे! दु:खाने आणि काळजीने माझ्या पोटात खड्ढा पडत आहे. मी वेदनेने वाकत आहे. मी खरच खूप घाबरलो आहे. माझ्या ह्रदया धडधडत आहे. मी गप्प बसू शकत नाही का? मी रणशिंग फुंकलेले ऐकले आहे. रणशिंग सैनिकांना युद्धासाठी बोलावीत आहे.

यिर्मया 29:7

मी तुम्हाला ज्या शहरांत पाठविले आहे, त्या शहरांचा फायदा करा. तुम्ही राहत असलेल्या शहराच्या भल्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करा. का? कारण त्या शहरात शांतता नांदत असेल तर तुम्हालाही शांती मिळेल.”

दानीएल 1:7

नंतर अश्पनाजने ह्या यहूदी तरुणांना बाबेलच्या लोकांच्या नावाप्रमाणे नावे दिली. ती अशी: दानीएलला बेल्टशस्सर, हनन्याला शद्रख, मीशाएलला मेशख, व अजऱ्याला अबेद्नगो.

दानीएल 2:26

राजाने दानीएलला (बेलशटस्सरला) प्रश्न केला, तू मला माझे स्वप्न व त्याचा अर्थ सागू शक तोस का?

दानीएल 2:37

राजा तू सर्वांमध्ये मोठा राजा आहेस. स्वर्गातल्या देवाने तुला राज्य, सत्ता, सामर्थ्य व वैभव दिले आहे.

दानीएल 4:4

मी नबुखद्नेस्सर माझ्या राजवाड्यात सुखात होतो. मी यशस्वी जीवन जगत होतो.

दानीएल 4:8

अखेर, दानीएलने येऊन मला स्वप्नाबद्दल सांगितले, (मी दानीएलला माझ्या दैवताबद्दलची भक्तिभावना व्यक्त करण्यासाठी बेल्टशस्सर असे नाव दिले आहे. पवित्र दैवतांचा आत्मा त्यांच्या अंगात आहे.)

दानीएल 4:24

हे राजा, ह्याचा अर्थ परात्पर देवाने ह्या गोष्टी तुझ्या आयुष्यात घडवून आणण्याची आज्ञा दिली आहे.

दानीएल 5:12

मी ज्या माणसाबद्दल बोलत आहे, त्याचे नाव दानीएल आहे. राजाने त्याला बेलट्शस्सर असे नाव दिले आहे. बेलट्शस्सर (दानीएल) फार चलाख आहे व त्याला अनेक गोष्टी माहीत आहेत, स्वप्नांचा अर्थ सांगण्याची, रहस्ये उलगडण्याची, अवघड प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याला बोलावून घे, तोच तुला भिंतीवरील लेखाचा अर्थ सांगेल.”

दानीएल 5:18

राजा,परात्पर देवाने, तुझ्या आजोबांना,राजा नबुखद्नेस्सरला खूप मोठा व सामर्थ्यशाली राजा केले. देवाने राजाला खूप महत्व दिले.

दानीएल 5:19

वेगवेगव्व्या राष्ट्रांतील आणि निरनिराळे भाषा बोलणारे लोक नबुखद्नेस्सरला घाबरत. का? कारण परात्पर देवाने त्याला महान बनविले होते. जर एखाद्याने मरावे असे नबुखद्नेस्सरला वाटले,तर तो त्याला मारे. ह्याउलट एखाद्याने जगावे असे त्याला वाटल्यास तो त्याला जगू देई. त्याच्या इच्छेप्रमाणे तो एखाद्याला महत्व देई, तर एखाद्याला क्षुद्र लेखी.

दानीएल 7:15

“मी, दानीएल, गोंधळलो व चिंतेत पडलो. मला दिसलेल्या दृष्टान्तानी मला काळजी वाटू लागली.

दानीएल 7:28

“येथे स्वप्न संपले मी दानीएल खूप घाबरलो भीतीने माझा चेहरा पांढराफटक पडला. मी पाहिलेल्या व ऐकलेल्या ह्या गोष्टी इतरांना सांगितल्या नाहीत.”

दानीएल 8:27

मी, दानीएल,खूप गळन गेलो ह्या दृष्टान्तानंतर बरेच दिवस मी आजारी हो तो. मग मी उठून राज्याच्या कामाला लागलो. पण दृष्टान्तामुळे मी खूपच अस्वस्थ होतो. मला दृष्टान्ताचा अर्थ समजला नाही.

दानीएल 10:16

मग माणसाप्रमाणे दिसणाऱ्या एकाने माझ्या ओठांना स्पर्श केला मग मी तोंड उघडले व बोलू लागलो. माझ्यासमोर उभ्या असणाऱ्याला मी म्हणालो,”महाराज दृष्टान्तात मी जे काही पाहिले, त्याने मी अस्वस्थ झालो आहे आणि घाबरलो आहे मी असहाय आहे.

हबक्कूक 3:10

तुला पाहून पर्वत कापले भूमीतून पाणी उसळले. समुद्राच्या पाण्याने प्रचंड गर्जना केली. जणू काही त्याने आपली भूमीवरील सत्ता गमावल्यामुळे ते आकांत करीत होते.

Interlinear

Choose Theme