मी, दानीएल,खूप गळन गेलो ह्या दृष्टान्तानंतर बरेच दिवस मी आजारी हो तो. मग मी उठून राज्याच्या कामाला लागलो. पण दृष्टान्तामुळे मी खूपच अस्वस्थ होतो. मला दृष्टान्ताचा अर्थ समजला नाही.
Cross references
रात्र सरेपर्यंत शमुवेल आपल्या बिछान्यावर पडून राहिला. सकाळ होताच उठून त्याने मंदिराची दारे उघडली. आपल्याला झालेल्या दृष्टांताची हकीकत एलीला सांगायची त्याला भीती वाटली.
मग राजाने दानीएलला राज्यात महत्वाचे अधिकारपद दिले. त्याने त्याला बहुमोल भेटी दिल्या. राजांने बाबेलच्या परगण्याची सत्ता दानीएलकडे सोपविली. त्याने सर्व ज्ञानी माणसांचा प्रमुख म्हणून दानीएलची नेमणूक केली.
तुझ्या अंगात देवतांचा आत्मा आहे असे मला कळले आहे. तुला रहस्ये समजतात, तू फार चलाख व फार ज्ञानी आहेस असे मी ऐकले आहे.
ह्या 120 प्रांताधिकाऱ्यांवर (सत्रपांवर) लक्ष ठेवण्यासाठी त्याने जे तीनजण नेमले, त्यातील एक दानीएल होता. कोणी राजाला फसवू नये व राज्याचे काहीही नुकसान होऊ नये म्हणून दारयावेशने तिघांची नेमणूक केली.
“येथे स्वप्न संपले मी दानीएल खूप घाबरलो भीतीने माझा चेहरा पांढराफटक पडला. मी पाहिलेल्या व ऐकलेल्या ह्या गोष्टी इतरांना सांगितल्या नाहीत.”
दृष्टान्त मी पाहिले की मी शशन शहरात आहे. शूशन ही एलाम परगण्याची राजधानी आहे. मी उलई नदीच्या काठी उभा होतो.
बोकडाला मेंढ्याच्या अंगावर जाताना मी पाहिले. बोकड फारच चिडला होता. त्याने मेंढ्याची दोन्ही शिंगे मोडली. मेंढा बोकडाला थोपवू शकला नाही.बोकडाने मेंढ्याला जमिनीवर लोळविले, त्याने मेंढ्याला तुडविले. बोकडापासून मेंढ्याला सोडवू शकेल असा तेथे कोणीही नव्हता.
मग मी एकटाच उरलो .मी दृष्टान्त पाहात होतो. त्या दृष्टान्ताने मी सुध्दा घाबरलो. माझा धीर खचला. मृत माणसाच्या चेहऱ्याप्रमाणे माझा चेहरा पांढराफटक पडला, मी असहाय झालो.
मग माणसाप्रमाणे दिसणाऱ्या एकाने माझ्या ओठांना स्पर्श केला मग मी तोंड उघडले व बोलू लागलो. माझ्यासमोर उभ्या असणाऱ्याला मी म्हणालो,”महाराज दृष्टान्तात मी जे काही पाहिले, त्याने मी अस्वस्थ झालो आहे आणि घाबरलो आहे मी असहाय आहे.
ही गोष्ट ऐकताच, मला कंप सुटला. मी मोठ्याने किंचाळलो मी अतिशय दुर्बल झाल्याचे मला जाणवले. मी जागच्या जागी नुसताच थरथर कापत उभा राहिलो. म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची वाट पाहीन शत्रू आमच्यावर हल्ला करील.