Home Bibles दानीएल 11:6 · मराठी बायबल
दानीएल 11:6 · मराठी बायबल

मग काही वर्षानी दक्षिणेचा राजा व तो सेनापती एक करार करतील.दक्षिपेच्या राजाची मलगी उत्तरेच्या राजाशी लग्र करील शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून ती असे करील.पण ती व दक्षिणेचा राजा पुरेसे शक्तिशाली नसतील. लोक तिच्याविरुध्द, तिला त्या देशात आणणाऱ्याविरुध्द तसेच अपत्य व तिला मदत करणारा या सर्वाविरुध्द उठतील.

Cross references

ईयोब 38:15

दुष्ट लोकांना दिवसाचा प्रकाश आवडत नाही. प्रकाश दैदीप्यमान असतो तेव्हा त्यांना त्यांच्या वाईट गोष्टी करता येत नाहीत.

स्तोत्रसंहिता 10:5

दुष्ट लोक नेहमीच काहीतरी वेडे वाकडे करीत असतात. देवाचे नियम आणि शहाणपणाच्या गोष्टी त्यांच्या लक्षात देखील येत नाहीत. देवाचे शत्रू त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत.

यहेज्केल 30:21

“मानवपुत्रा, मिसरच्या राजाचा फारोचा हात (सत्ता) मी मोडला आहे. त्याला कोणीही मलमपट्टी करणार नाही व औषधही लावणार नाही. तो बरा होणार नाही. त्यांच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती येणार नाही.”

यहेज्केल 38:8

पुष्कळ काळानंतर तुम्हाला कामाकरिता बोलविण्यात येईल. पुढील काळात युद्धातून तरलेल्या प्रदेशात, तुम्ही याल. ह्या प्रदेशातील लोकांना पुष्कळ वेगवेगळ्या राष्ट्रांतून गोळा केले जाईल आणि इस्राएलच्या पर्वताकडे परत आणले जाईल. पूर्वी इस्राएलच्या पर्वतांचा पुन्हा पुन्हा नाश केला गेला. पण हे लोक इतर राष्ट्रांतून परत येतील. ते सर्वच्या सर्व सुरक्षित राहतील.

दानीएल 11:7

पण तिच्याच कुटुंबातील एकजण (दक्षिणेच्या राजाची)जागा घेईल तो उत्तरेच्या राजाच्या सैन्यावर हल्ला करील.

दानीएल 11:13

उत्तरेचा राजा दुसरे सैन्य जमवेल ते पहिल्या सैन्याहूनही मोठे असेल खूप वर्षानंतर तो हल्ला करील.ते सैन्य प्रचंड असेल.त्याच्याजवळ पुष्कळ शस्त्रास्त्रे असतिल.ते युघ्दाला तयार असेल.

दानीएल 11:15

मग उत्तेरचा राजा येऊन तटांना उतार बांधून मजबूत शहर ताब्यात घेईल. दक्षिणेच्या सैन्याला हल्ला परतविण्याचे वळ असणार नाही. दक्षिणेच्या सैन्यातील शक्तिवाम सैनिकसुध्दा उत्तरेचे सैन्य थोपवायला परे पडणार नाहीत.

दानीएल 11:40

अंतकाळी, दक्षिणेचा राजा उत्तरेच्या राजाशी लढेल. उत्तरेचा राजा त्याच्यावर चढाई करील. तो रथ घोडेस्वार आणि मोठमोठी गलबते घेऊन येईल व चढाई करील. तो पुराच्या लोढ्यांप्रमाणे येईल.

जखऱ्या 11:16

ह्याचा अर्थ मी ह्या देशासाठी नवीन मेंढपाळ निवडीन असा होईल. पण ह्या तरुण माणसाला हरवलेल्या मेंढ्यांची काळजी घेणे जमणार नाही. त्याला जखमी मेंढ्यांचा औषघोपचार करुन त्यांच्या जखमा भरुन काढणे जमणार नाही. ज्या मेंढ्या वाचल्यात त्यांचा चारापाणी तो करु शकणार नाही. सशक्त मेंढ्या संपूर्ण खाल्ल्या जातील. फक्त त्यांचे खूर शिल्लक राहतील.”

Interlinear

Choose Theme