Home Bibles दानीएल 11:40 · मराठी बायबल
दानीएल 11:40 · मराठी बायबल

अंतकाळी, दक्षिणेचा राजा उत्तरेच्या राजाशी लढेल. उत्तरेचा राजा त्याच्यावर चढाई करील. तो रथ घोडेस्वार आणि मोठमोठी गलबते घेऊन येईल व चढाई करील. तो पुराच्या लोढ्यांप्रमाणे येईल.

Cross references

यशया 5:28

त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत. त्यांची धनुष्ये सज्ज आहेत. त्यांच्या घोड्यांचे खूर दगडासारखे कठीण आहेत. त्यांच्या रथांच्या मागे धुळीचे लोट उठतात.

यशया 21:1

बाबेलोनबद्दल (समुद्राजवळचे वाळवंट) देवाचा शोक संदेश.वाळवंटातून काहीतरी येत आहे. नेगेबच्या वाळवंटातून येणाऱ्या वादळाप्रमाणे ते आहे. भयंकर देशातून ते येत आहे.

यशया 66:15

पाहा! परमेश्वर अग्नी घेऊन येत आहे. परमेश्वराचे सैन्य धुळीचे लोट उडवीत येत आहे. आपल्या रागाचा उपयोग परमेश्वर लोकांना शिक्षा करण्यासाठी करील. परमेश्वर रागावल्यावर त्या लोकांना अग्नीच्या ज्वाळांनी शिक्षा करील.

यिर्मया 4:13

पाहा! शत्रू ढगाप्रमाणे वर येतो. त्याचे रथ वावटळीप्रमाणे दिसतात, त्यांचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. हे सर्व आपल्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. आपला विध्वंस झाला!

यहेज्केल 38:4

मी तुला पकडीन आणि परत आणीन. तुझ्या सैन्यातील सर्व माणसांना मी परत आणीन. घोडे व सर्व घोडेस्वार यांनाही मी परत आणीन. मी तुम्हाला सर्वांना वेसण घालून परत आणीन. सर्व सैनिकांनी गणवेश घातलेले असतील आणि ढाली व तलवारी घेतलेल्या असतील.

यहेज्केल 38:9

पण तू त्यांच्यावर चढाई करण्यासाठी येशील. तू वादळासारखा येशील. सर्व देशाला व्यापणाऱ्या, गडगडाट करणाऱ्या ढगासारखा तू येशील, तू आणि तुझ्याबरोबरचे इतर राष्ट्रांचे सैन्य ह्या लोकांवर हल्ला करण्यासाठी याल.”

यहेज्केल 38:14

देव म्हणाला, “मानवपुत्रा, माझ्यावतीने गोगशी बोल. त्याला सांग की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘माझे लोक शांतीने व सुरक्षीत राहात असतील, तेव्हा तू त्यांच्यावर चढाई करण्यासाठी येशील.

दानीएल 8:17

मग माणसाप्रमाणे दिसणारा गाब्रीएल देवदूत माझ्याजवळ आला. मी खूप घाबरलो. मी जमिनीवर पडलो. पण गाब्रीएल मला म्हणाला,” मुला हा दृष्टान्त क्रोधाच्या शेवटच्या वेळेसंबंधी आहे हे समजून घे.”

दानीएल 11:5

दक्षिणेचा राजा बलवान होईल पण मग त्याचाच एक सेनापती त्याचा पराभव करील. सेनापती राज्या करू लागेल व तो खूपच सामर्थ्यवान होईल.

दानीएल 11:10

उत्तरेच्या राजाची मुले युध्दाची तयारी करतील. ते मोठे सैन्य जमवितील जोरदार पुराप्रमाणे ते सैन्य चटकन देश पार करील. दक्षिणेच्या राजाच्या भक्कम किल्ल्यावरसुध्दा ते सैन्य हल्ला करील.

दानीएल 11:22

तो प्रचंड व शक्तिशाली सैन्यांच्या पराभव करील तो नेत्याचा कराराच्या साहाय्याने पराभव करील.

दानीएल 11:26

दक्षिणेच्या राजाचे चांगले मित्र समजले जाणारेच त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतील त्याचे सैन्य पराभूत होईल.लढाईत त्याचे पुष्कळ सैनिक मारले जातील.

दानीएल 11:35

काही सुज्ञ यहूदी चुका करतील व पडतील पण छळ झालाच पाहिजे.का? कारण त्यामुळे ते अखेरच्या क्षणापर्यंत अधिक सामर्थ्यशाली, अधिक शुद्ध आणि निर्दोष होतील मग, योग्य वेळी, अंताचा काळ येईल।”

दानीएल 12:4

“पण, दानीएला, तू हा संदेश गुप्त ठेव तू खाते बंद करून टाक अंतकाळापर्यंत हे तू गुप्त ठेवले पाहिजेस. खूप लोक इकडे तिकडे सत्यज्ञानाचा शोध घेतील आणि सत्यज्ञान वाढेल.’

जखऱ्या 9:14

परमेश्वर त्यांना दर्शन देईल आणि विजेप्रमाणे आपले बाण सोडील. परमेश्वराने, माझ्या प्रभुने, तुतारी फुंकताच वाळवंटातील वाळूच्या वादळाप्रमाणे सैन्य हल्ला करील.

प्रकटीकरण 9:16

घोडदळाची संख्या मी ऐकली. तो 20 0,000,000 इतके घोडदळ होते.

प्रकटीकरण 16:12

सहाव्या देवदूताने त्याची वाटी फरात नदीवर ओतली. नदीतील पाणी सुकून गेले. त्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या राजांसाठीरस्ता तयार झाला.

Interlinear

Choose Theme