Home Bibles दानीएल 11:15 · मराठी बायबल
दानीएल 11:15 · मराठी बायबल

मग उत्तेरचा राजा येऊन तटांना उतार बांधून मजबूत शहर ताब्यात घेईल. दक्षिणेच्या सैन्याला हल्ला परतविण्याचे वळ असणार नाही. दक्षिणेच्या सैन्यातील शक्तिवाम सैनिकसुध्दा उत्तरेचे सैन्य थोपवायला परे पडणार नाहीत.

Cross references

यहोशवा 1:5

मोशेला दिली तशीच तुलाही मी साथ देईन. तुला आता कोणी तुझे आयुष्य असेपर्यंत अटकाव करू शकणार नाही. मी तुला सोडणार नाही, तुला अंतर देणार नाही.

नीतिसूत्रे 21:30

परमेश्वर ज्याच्या विरुद्व आहे अशी योजना यशस्वी करुन दाखविणारा एकही शहाणा माणूस नाही.

यिर्मया 5:10

“यहूदाच्या द्राक्षवेलींच्या रांगातून जा. वेली तोडून टाका (पण त्यांचा संपूर्ण नाश करु नका) त्यांच्या फांद्या तोडा. का? ह्या फांद्या परमेश्वराच्या मालकीच्या नाहीत.

यिर्मया 6:6

सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, “यरुशलेमच्या भोवतालची झाडे कापा आणि तिच्याविरुद्ध मोर्चा बांधा. ह्या नगरीला शिक्षा व्हावीच ह्या नगरीच्या आत जुलुमाशिवाय काहीही नाही.

यिर्मया 33:4

परमेश्वर इस्राएलचा देव आहे. परमेश्वर यरुशलेममधील घरांविषयी व यहूदातील राजांच्या राजवाड्यांविषयी पुढील गोष्टी सांगतो, शत्रू ती घरे पाडील. नगरांच्या तटबंदीपर्यंत तो उतरंडी बांधील. शत्रू शहरांतील लोकांशी तलवारीने लढेल.

यिर्मया 52:4

म्हणून सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमवर चाल केली. त्याने आपले सर्वच्या सर्व सैन्य बरोबर घेतले. त्या सैन्याने यरुशलेमच्या बाहेर तळ ठोकला. मग यरुशलेमचा तट ओलांडून जाण्यासाठी त्यांनी तटाभोवती उतरंडी तयार केल्या.

यहेज्केल 4:2

मग तू म्हणजे नगरीला वेढा घातलेले सैन्य आहेस असे मान. नगरीभोवती मातीची भिंत बांध. म्हणजे नगरीवर हल्ला करणे सोपे होईल. त्या भिंतीपर्यंत जाणारे कच्चे रस्ते तयार कर. भिंती फोडण्यासाठी मोठे ओंडके आण आणि नगरीभोवती सैन्याचा तळ ठोक.

यहेज्केल 17:17

आणि मिसरचा राजा यहूदाच्या नव्या राजाचे रक्षण करु शकणार नाही. तो कदाचित् मोठे सैन्य पाठवील, पण मिसरची प्रचंड शक्ती यहूदाला वाचवू शकणार नाही. नबुखद्नेस्सरचे सैन्य नगरी हस्तगत करण्यासाठी मातीचे रस्ते व भिंती बांधील खूप लोक मरतील.

दानीएल 8:7

बोकडाला मेंढ्याच्या अंगावर जाताना मी पाहिले. बोकड फारच चिडला होता. त्याने मेंढ्याची दोन्ही शिंगे मोडली. मेंढा बोकडाला थोपवू शकला नाही.बोकडाने मेंढ्याला जमिनीवर लोळविले, त्याने मेंढ्याला तुडविले. बोकडापासून मेंढ्याला सोडवू शकेल असा तेथे कोणीही नव्हता.

दानीएल 11:6

मग काही वर्षानी दक्षिणेचा राजा व तो सेनापती एक करार करतील.दक्षिपेच्या राजाची मलगी उत्तरेच्या राजाशी लग्र करील शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून ती असे करील.पण ती व दक्षिणेचा राजा पुरेसे शक्तिशाली नसतील. लोक तिच्याविरुध्द, तिला त्या देशात आणणाऱ्याविरुध्द तसेच अपत्य व तिला मदत करणारा या सर्वाविरुध्द उठतील.

Interlinear

Choose Theme