इसहाकच्या उच्च स्थानाचा नाश होईल. इस्राएलची पवित्र स्थाने धुळीला मिळतील. मी यराबाम घराण्यावर हल्ला करीन आणि त्यांना तलवारीने ठार मारीन.”
Cross references
तेथून इसहाक बैर - शेबा येथे गेला;
अशा रीतीने इस्राएलाने मिसरच्या प्रवासास सुरवात केली. प्रथम तो बैरशेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाची उपासना केली व देवाला अर्पणे वाहिली.
तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल.
यराबामने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच या यराबामने चालू ठेवली.
यराबामचा मुलगा जखऱ्या याने इस्राएलवर शोमरोनमध्ये सहा महिने राज्य केले. यहूदाचा राजा अजऱ्या याच्या कारकिर्दीचे तेव्हा अडतिसावे वर्ष होते.
मग याबेशचा मुलगा शल्लूम याने जखऱ्याविरुध्द कट केला. इब्लाममध्ये त्याने जखऱ्याला ठार केले. आणि स्वत: राज्यावर आला.
तुझी पवित्र माणसे स्वत:च्या देशात अगदी थोडा काळ राहिली. नंतर आमच्या शत्रूंनी तुझे पवित्र मंदिर पायाखाली तुडविले.
त्या पर्वंतांना पुढील गोष्टी सांग.‘इस्राएलच्या पर्वतांनो, परमेश्वराकडून, माझ्या प्रभूकडून आलेला संदेश ऐका. देव, माझ्या प्रभू, टेकड्या, पर्वत, घळी, दऱ्या या सर्वांना उद्देशून म्हणतो की पाहा! मी (म्हणजेच देव) तुमच्याविरुद्व लढण्यासाठी शत्रूला आणीत आहे. मी तुमच्या उच्चस्थानांचा नाश करीन.
इस्राएलाने पाप केले आणि उच्चस्थाने बांधली. आवेन मधील उच्चस्थानांचा नाश केला जाईल त्यांच्या वेदीवर काटेकुटे व तण वाढतील मग ते पर्वतांना म्हणतील, “आम्हाला झाका” आणि टेकड्यांना म्हणतील, “आमच्यावर पडा.”
इस्राएलने पाप केले व त्याबद्दल त्यांना शिक्षा करीन. मी बेथेलच्या वेदी नष्ट करीन. वेदीची शिगे तोडली जातील व ती मातीत पडतील.
पण बेथेलास शरण जाऊ नका; गिल्गालला जाऊ नका; सीमा ओलांडून खाली बैरशेब्यालाही जाऊ नका. गिल्गालमधील लोकांना कैदी म्हणून नेले जाईल. आणि बेथेलचा नाश केला जाईल.
मी प्रभूला वेदीजवळ उभे असल्याचे पाहिले तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यावर मार मग इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल. खांब लोकांच्या डोक्यावर पाड. कोणी जिवंत राहिल्यास, मी त्याला तलवारीने ठार मारीन. एखादा पळून जाईल, पण सुटणार नाही. लोकांपैकी एकही सुटून पळू शकणार नाही.