Home Bibles आमोस 7:8 · मराठी बायबल
आमोस 7:8 · मराठी बायबल

परमेश्वर मला म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?” मग माझा प्रभू म्हणाला, “पाहा, माझ्या माणसांमध्ये, इस्राएलमध्ये मी ओळंबा धरीन. मी त्यांच्या दृष्टपणाकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. मी वाईट डाग काढून टाकीन.

Cross references

2 राजे 21:13

शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबच्या घराण्याचा ओळंबा मी यरुशलेमवर धरीन. थाळी घासूनपुसून पालथी करुन ठेवावी तशी मी यरुशलेमची गत करीन.

यशया 28:17

“भिंतीचा सरळपणा पाहण्यासाठी लोक जसा ओळंबा वापरतात, तसाच योग्य गोष्ट दाखविण्यासाठी मी न्यायबुध्दी व चांगुलपणा ह्यांचा वापर करीन.“तुम्ही पापी, तुमच्या कपटाच्या व असत्याच्या मागे लपण्याचा प्रयत्न करता, पण तुम्हांला शिक्षा होईल. मी वादळाप्रमाणे अथवा पुराप्रमाणे येऊन तुमच्या लपायच्या जागा नष्ट करीन.

यिर्मया 1:11

मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो असा होता. “यिर्मया, तुला काय दिसते?”मी परमेश्वराला सांगितले, “मला बदामाच्या झाडापासून केलेली एक काठी दिसते.”

यिर्मया 15:6

यरुशलेम, तू मला सोडून गेलीस!” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “तू पुन्हा पुन्हा माझा त्याग केलास म्हणून मी तुला शिक्षा करीन. तुझा नाश करीन. तुझी शिक्षा पुढे ढकलण्याचा आता मला वीट आला आहे.

विलापगीत 2:8

सियोनकन्येची तटबंदी नष्ट करण्याचा परमेश्वराने बेत केला. तट कोठे फोडायचा हे दाखविण्यासाठी ओळंब्याने त्याने खूण केली. नाश थांबविण्यासाठी त्यांने स्वत:ने काही केले नाही. म्हणून त्याने सर्व तटांना शोक करण्यास भाग पाडले. त्या सर्व ओस पडल्या.

यहेज्केल 7:2

तो म्हणाला, “मानवपुत्रा, हा आहे परमेश्वराचा, तुझ्या प्रभूचा, इस्राएलच्या भूमीसाठी संदेश.शेवट येत आहे. संपूर्ण देशाचा नाश होईल.

होशेय 1:6

मग गोमरला पुन्हा दिवस गेले. ह्या खेपेस तिने एका मुलीला जन्म दिला. परमेश्वर होशेयला म्हणाला, “तिचे नाव लो - रूहामा ठेव. का? कारण मी यापुढे इस्राएल राष्टाला अजिबात दया दाखविणा नाही. मी त्यांना क्षमा करणार नाही.

आमोस 8:2

परमेश्वराने मला विचारले, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “उन्हाळी फळांची टोपली.” मग परमेश्वर मला म्हणाला, “माझ्या लोकांचा, इस्राएलचा, शेवट आला आहे. ह्यापुढे मी त्यांच्या पापाकडे दुर्लक्ष करणार नाही.

मीखा 7:18

परमेश्वरा तुझ्यासारखा दुसरा देव नाही. पापी लोकांनाही तू क्षमा करतोस. तुझ्या वाचलेल्या लोकांनाही तू क्षमा करतोस. परमेश्वर अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणारा नाही. का? कारण त्याला दयाळू व्हायला आवडते.

नहूम 1:8

पण त्याच्या शत्रूंचा तो पूर्णपर्ण नाश करील पुराच्या लोंढ्याप्रमाणे परमेश्वर त्याना धुवून टाकील अंधारातून तो त्याच्या शत्रूंचा पाठलाग करील.

जखऱ्या 4:2

मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते आहे?”मी म्हणालो, “मला भरीव सोन्याचे दिवठाण दिसत आहे. त्यावर सात दिवआहेत. दिवठाणाच्या डोक्यावर एक वाटी आहे. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते.

जखऱ्या 5:2

देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?”मी म्हणालो, “मला उडता पट दिसतो. तो 30 फूट लांब व 115फूट रुंद आहे.”

Interlinear

Choose Theme