Home Bibles 2 राजे 15:10 · मराठी बायबल
2 राजे 15:10 · मराठी बायबल

मग याबेशचा मुलगा शल्लूम याने जखऱ्याविरुध्द कट केला. इब्लाममध्ये त्याने जखऱ्याला ठार केले. आणि स्वत: राज्यावर आला.

Cross references

1 राजे 15:28

आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून तिसरे वर्ष होते. मग बाशा इस्राएलचा राजा झाला.

1 राजे 16:9

जिम्री हा एला राजाचा अधिकाही होता. एलच्या एकूण रथांपैकी अर्धे जिम्रीच्या ताब्यात होते. तरीही त्याने एलाविरुध्द कट केला. एला राजा तिरसा येथे अरसाच्या घरी मद्याच्या धुंदीत होता. अरसा हा तिरसा येथील महालावरचा मुख्य अधिकारी होता.

1 राजे 16:10

जिम्रीने सरळ घरात घुसून एला राजाला ठार केले. आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष होते. एलानंतर हा जिम्री इस्राएलचा राजा झाला.

2 राजे 9:24

पण येहूने सर्व शक्तीनिशी धनुष्य ओढून योरामचा बरोबर दोन बाडूंच्यामध्ये वेध घेतला. बाण योरामच्या हृदयातून आरपार गेला. योराम रथात मरुन पडला.

2 राजे 9:31

येहूने नगरात प्रवेश केला. ईजबेल म्हणाली, “काय रे जिम्री? त्याच्या सारखेच तू ही आपल्या स्वामीला मारलेस!”

2 राजे 12:21

शिमाथचा मुलगा योजारवार आणि शोमरचा मुलगा यहोजाबाद हे योवाशचे कारभारी होते. त्यांनी हे कृत्य केले.दावीद नगरात लोकांनी योवाशला त्याच्या पूर्वजांसमवेत पुरले. योवाशचा मुलगा अमस्या त्याच्यानंतर राज्य करु लागला.

2 राजे 14:19

अमस्याविरुध्द यरुशलेममध्ये लोकांनी कट केला. तेव्हा अमस्या लाखीश येथे पळाला. पण लोकांनी माणसे पाठवून त्याचा लाखीशर्पंत पाठलाग केला आणि त्यांनी अमस्याचा तेथे वध केला. अमस्याचा मृत्यू

2 राजे 15:14

गादीचा मुलगा मनहेम तिरसाहून शोमरोनमध्ये आला त्याने शल्लूमला ठार केले. मग मनहेम स्वत: राजा झाला.

2 राजे 15:22

मनहेम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा पेकह्या नवीन राजा झाला.

2 राजे 15:25

रमाल्या याचा मुलगा पेकह हा पेकह्याच्या सैन्याचा सरदार होता. पेकहने पेकह्याला मारले. शोमरोन मध्ये राजवाड्यातच त्याने हा वध केला. वधाच्या वेळी पेकह बरोबर गिलादमधली पन्नास माणसे होती. यानंतर पेकह राजा झाला.

2 राजे 15:30

एला याचा मुलगा होशे याने रमाल्याचा मुलगा पेकह याच्याविरुध्द कट केला. होशेने पेकहला ठार केले. पेकह नंतर मग होशे राजा झाला. उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करीत असल्याच्या विसाव्या वर्षी हे झाले.

होशेय 1:4

परमेश्वराने होशेयला सांगितले, “या मुलाचे नाव इज्रेल ठेव. का? कारण लवकरच, येहू घराण्याने इज्रेल दरीत जो रक्तपात केला, त्याबद्दल मी त्यांना शिक्षा करणार आहे. मग मी इस्राएल राष्टांचा शेवट करीन.

होशेय 7:7

ते तापलेल्या भट्टीप्रमाणे आहेत. त्यांनी त्यांच्या राज्यकर्त्यांचा नाश केला. त्यांचे सर्व राजे पडले पण एकानेही मदतीसाठी मला हाक मारली नाही.”

होशेय 8:4

इस्राएल लोकांनी त्यांचा राजा निवडला, पण सल्ला विचारण्यासाठी ते माझ्याकडे आले नाहीत. इस्राएल लोकांनी नेते निवडले, पण मी ओळखत असणाऱ्या लोकांची निवड त्यांनी केली नही. इस्राएल लोकांनी त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचा उपयोग स्वत:साठी मर्ती तयार करण्याकंरिता केला. म्हणून त्यांचा नाश होईल.

आमोस 7:9

इसहाकच्या उच्च स्थानाचा नाश होईल. इस्राएलची पवित्र स्थाने धुळीला मिळतील. मी यराबाम घराण्यावर हल्ला करीन आणि त्यांना तलवारीने ठार मारीन.”

Interlinear

Choose Theme