“भिंतीचा सरळपणा पाहण्यासाठी लोक जसा ओळंबा वापरतात, तसाच योग्य गोष्ट दाखविण्यासाठी मी न्यायबुध्दी व चांगुलपणा ह्यांचा वापर करीन.“तुम्ही पापी, तुमच्या कपटाच्या व असत्याच्या मागे लपण्याचा प्रयत्न करता, पण तुम्हांला शिक्षा होईल. मी वादळाप्रमाणे अथवा पुराप्रमाणे येऊन तुमच्या लपायच्या जागा नष्ट करीन.
Cross references
म्हणून उद्या ह्याच वेळेस मी गारांचा असा काही वाईट वादळी वर्षाव मिसरवर आणीन की असा गारांचा वादळी वर्षाव मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून कधी आला नाही.
इस्राएल सैन्य बेथ-होरोनपासून अजेकापर्यंत पाठलाग करत असताना परमेश्वराने शत्रूवर आकाशातून मोठमोठ्या गारांचा वर्षाव केला. त्या मारानेच अनेकजण ठार झाले. इस्राएल सैन्याच्या तलवारीने जितके शत्रूसैन्य प्राणाला मुकले त्यापेक्षा कितीतरी जास्त या गारांच्या वर्षावाला बळी पडले.
शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबच्या घराण्याचा ओळंबा मी यरुशलेमवर धरीन. थाळी घासूनपुसून पालथी करुन ठेवावी तशी मी यरुशलेमची गत करीन.
त्या दुष्टांना मरणघाटिका जवळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला. ते पुरात वाहून गेले.
न्याय प्रस्थापित होईल आणि तो न्यायीपणा आणेल आणि नंतर प्रामाणिक आणि चांगले लोक तेथे येतील.
सर्वशक्तिमान परमेश्वर प्रामाणिकपणाने योग्य न्याय करील आणि लोकांना त्याची महानता कळेल. पवित्र देव योग्य त्याच गोष्टी करेल आणि लोक त्याचा आदर करतील.
समुद्रकाठच्या वाळूच्या कणांप्रमाणे तुझे लोक खूप असले तरी त्यातील फक्त थोडेच परमेश्वराकडे परत येतील. ते देवाकडे वळतील पण त्यापूर्वी देशाचा नाश केला जाईल. देवाने घोषित केले आहे की तो देश उध्वस्त करणार आहे. नंतर चांगुलपणा देशात येईल. तो दुथडीभरून वाहाणाऱ्या नदीसारखा असेल.
परमेश्वरा, तू गरजू गरीब लोकांचा आसरा आहेस. त्यांच्यापुढील अनेक समस्या त्यांना खच्ची करू पाहतात पण तू त्यांचे रक्षण करतोस. परमेश्वरा, तू उन्हापावसापासून रक्षण करणाऱ्या निवाऱ्यासारखा आहेस. पीडा या तुफान वादळ व पावसासारख्या असतात. पण पावसाची झड भिंतीवर आपटून खाली पडते. घरातल्या लोकांना तिचा त्रास होत नाही.
पाहा! माझ्या प्रभूकडे एक सशक्त व शूर वीर आहे. तो गारपिटीप्रमाणे व पावसाच्या झडीप्रमाणे येईल. वादळाप्रमाणे किंवा महापुराप्रमाणे तो या देशात येईल आणि हा मुकुट (शोमरोन) धुळीत फेकून देईल.
तुम्ही लोक म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करारनामा केला आहे. अधोलोकाशी आम्ही करार केला आहे म्हणून आम्हांला शिक्षा होणार नाही. शिक्षा आमचे काही वाकडे करू शकणार नाही. कारण आम्ही कपट व असत्य याच्यांमागे लपून बसू.”
परमेश्वराचा श्वास (आत्मा), पाणी वाढत जाऊन गळ्यापर्यंत पोहोचणाऱ्या एखाद्या मोठ्या नदीप्रमाणे आहे. परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करील. हा न्याय कसा असेल? तर ‘नाशाच्या चाळणीतून’ राष्ट्रांना चाळून काढल्याप्रमाणे तो असेल. जसे लगाम घालून जनावरांना ताब्यात ठेवले जाते तसे लोकांना लगाम घालून परमेश्वर नियंत्रणात ठेवील.
असे जर झाले तर वारा व पाऊस ह्यापासून बचाव करण्यासाठी जसा अडोसा असतो तसा राजा निवाऱ्याची जागा होईल. वाळवंटातील झऱ्याप्रमाणे अथवा उष्ण प्रदेशातील मोठ्या खडकाखालील सावलीसारखा लोकांना तो वाटेल.
माझे लोक शांतीच्या सुंदर मळ्यात राहतील. माझी माणसे सुरक्षिततेच्या तंबूत राहतील. ते निवांत आणि शांत जागी राहतील.
काही लोक खोटे बोलतात त्यावर विश्वास ठेवू नका. ते म्हणतात “हे परमेश्वराचे मंदिर आहे. परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर.”
म्हणून, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले ते यरुशलेममधील माझ्या नावाचे घर मी नष्ट करीन. शिलोतील मंदिराप्रमाणे मी ह्या मंदिराचा नाश करीन. शिलोतील मंदिराप्रमाणे मी ह्या मंदिराचा नाश करीन.
म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी ह्या जागेवर माझा राग काढीन. मी माणसांना, प्राण्यांना, रानातील झाडांना आणि पिकांना शिक्षा करीन. माझा राग तप्त अग्नीप्रमाणे असेल. कोणीही तो विझवू शकणार नाही.”
आता परमेश्वराकडून वादळाप्रमाणे शिक्षा येईल. परमेश्वराचा राग तुफानाप्रमाणे असेल. तो त्या दुष्ट लोकांच्या डोक्यावर आदळून त्यांच्या डोक्यांचा चेंदामेंदा करील.
“परमेश्वर खूप रागावला होता. त्याने लोकांना शिक्षा केली. शिक्षा वादळाप्रमाणे आली. त्या दुष्ट माणसांविरुद्ध शिक्षा तुफानाप्रमाणे आली.
“ते खोटे संदेष्टे पुन्हा पुन्हा माझ्या लोकांशी खोटे बोलले. त्यांनी ‘शांती प्रस्थापित होईल.’ असे सांगितले. पण तेथे शांती नाही. भिंतीची चांगली दुरुस्ती करुन लोकांनी लढायला सज्ज होण्याची जरुरी आहे. पण त्याऐवजी लोक भिंतीना फक्त गिलावा करतात.
तुम्ही भिंतीला गिलावा करता. पण संपूर्ण तटबंदीच मी उद्ध्वस्त करीन. ती मी जमीनदोस्त करीन. ती तुमच्या अंगावर पडेल आणि मग तुम्हाला कळून चुकेल की मीच परमेश्वर आहे.
मी रोगराई व मृत्यू ह्याद्वारे गोगला शिक्षा करीन. गोग व पुष्कळ राष्ट्रांतून गोळा झालेल्या त्याच्या सैन्यावर गारा, आग व गंधक ह्यांचा वर्षाव करीन.
तो प्रचंड व शक्तिशाली सैन्यांच्या पराभव करील तो नेत्याचा कराराच्या साहाय्याने पराभव करील.
परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. परमेश्वर, त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता (भिंत ओळंब्याने सरळ केलेली होती.)
मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”
आता आपणांला माहीत आहे की, जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय देव करतो. आणि देवाचा न्याय योग्य असतो.
पण तुम्ही लोक कठीण व उद्धट मनाचे आहात, तुम्ही बदलण्यास तयार नाही, त्यामुळे तुम्ही स्वत:च तुमची शिक्षा अधिकाधिक वाढवित आहात. जेव्हा देव (तुम्हाला) त्याचा क्रोध दर्शवील, त्यावेळी तुम्हांला शिक्षा होईल. त्या दिवशी लोक देवाचा यथायोग्य न्याय पाहतील.
कारण पूर्ण करुन व आटोपते घेऊन प्रभु पृथ्वीवर आपला शब्द अंमलात आणील.”
जेव्हा मागे जग अस्तित्वात होते तेव्हा याच घटकणेमुळे महापूर येऊन पृथ्वीचा नाशझाला.
पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला आणि रक्तमिश्रित गारा वअग्नि पृथ्वीवर टाकण्यात आले. तेव्हा पृथ्वीचा एक तृतीयांश भाग आणि एक तृतीयांश झाडे व सर्व हिरवे गवत जळून गेले.
मग देवाने स्वर्गातील मंदिर उघडले. तेव्हा तेथे कराराचा कोश दिसला आणि विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट,भूकंप व गारांचे वादळ झाले.
लोकांवर आकाशातून गारांचा वर्षाव झाला. या प्रत्येकगारा 100 पौंडवजनाच्या होत्या, या गारांच्या संकटामुळे लोकांनी पश्चात्ताप करण्याऐवजी देवाला शाप दिले कारण हीपीडा खरोखरच महाभयंकर होती.
कारण त्याचे न्यायनिवाडे खरे आणि योग्य आहेत ज्या मोठ्या वेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने सर्व पृथ्वी भ्रष्ट केली,तिला देवाने शिक्षा केली आहे. त्याच्या सेवकाच्या रक्ताचा त्याने सूड घेतला आहे.”