Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 8:13 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 8:13 · मराठी बायबल

स्वत: शिमोनाने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिप्प बरोबर राहू लागला. आणि झालेले चमत्कार आणि अद्भुत चिन्हे पाहून शिमोन आश्चर्याने थक्क झाला.

Cross references

स्तोत्रसंहिता 78:35

देव त्यांचा खडक आहे याची आठवण त्यांना आली. सर्वशक्तिमान देवाने त्यांना वाचवले याची त्यांना आठवण झाली.

स्तोत्रसंहिता 106:12

नंतर आमच्या पूर्वजांचा देवावर विश्वास बसला. त्यांनी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली.

हबक्कूक 1:5

परमेश्वर म्हणाला, “इतर राष्ट्रांकडे पाहा! त्यांच्यावर लक्ष ठेव. मग तू विस्मयचकित होशील. मी अशा काही गोष्टी घडवून आणीन की तुझा विश्वास बसले. नुसते सांगून तुला ते खरे वाटणार नाही.

लूक 8:13

जे बी खडकावर पडते ते असे आहे की, ते ऐकतात आणि आनंदाने संदेश ग्रहण करतात. पण त्यांना मूळ नसते. ते काही वेळ विश्वास ठेवतात पण परीक्षेच्या वेळी देवापासून दूर जातात.

योहान 2:23

वल्हांडण सणासाठी येशू यरुशलेमात होता. पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला कारण तो करीत असलेले चमत्कार त्यांनी पाहिले.

योहान 5:20

पिता पुत्रगवर प्रीति करतो आणि ज्या गोष्टी पिता करतो त्या सर्व तो पुत्राला दाखवितो. हा मनुष्य बरा झाला, परंतु यापेक्षाही मोठमोठ्या गोष्टी करण्याचे पिता पुत्राला दाखवील. तेव्हा तुम्ही सर्व जण चकित व्हाल.

योहान 7:21

येशू त्यांना म्हणाला, “मी एक चमत्कार केला आणि तुम्ही सारे चकित झालात.

योहान 8:30

येशू या गोष्टी बोलत असता अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

प्रेषितांचीं कृत्यें 8:6

फिलिप्प ज्या गोष्टी त्यांना सांगत असे त्या ते लक्षपूर्वक ऐकत असत.

प्रेषितांचीं कृत्यें 8:21

या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस. कारण तुझे अंत:करण देवासमोर योग्य नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 13:44

पुढील शब्बाथवारी शहरातील जवळ जवळ सर्व लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी एकत्र आले.

प्रेषितांचीं कृत्यें 19:11

देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले.

याकोब 2:19

तुम्ही असा विश्वास धरता का की, फक्त एकच देव आहे? उत्तम! भुतेदेखील असा विश्वास धरतात व थरथर कापतात.

Interlinear

Choose Theme