Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 13:44 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 13:44 · मराठी बायबल

पुढील शब्बाथवारी शहरातील जवळ जवळ सर्व लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी एकत्र आले.

Cross references

उत्पत्ति 49:10

यहूदाचे कुटुंबीय राजे होतीलआणि योग्य राजा येईपर्यंत त्याच्या कुळातील राजवेत्र जाणार नाही मग बहुतेक जण त्याच्या आज्ञेत राहतील व त्याची सेवा करतील.

स्तोत्रसंहिता 110:3

तू तुझ्या सैन्याची जमावाजमव करशील त्यावेळी तुझे लोक स्वयंसेवक बनून दाखल होतील. त्यांचा खास पोशाख परिधान करतील आणि भल्या पहाटे एकत्र जमतील. हे तरुण लोक जमिनीवर जसे दव पडते त्याप्रमाणे तुझ्याभोवती असतील.

यशया 11:10

त्या वेळेला इशायाच्या घराण्यात एक विशेष व्यक्ती असेल ती व्यक्ती ध्वजाप्रमाणे असेल हा “ध्वज” सर्व राष्ट्रांना त्याच्याभोवती जमण्याचे आवाहन करील. सर्व राष्ट्रे, त्यांनी करायच्या कार्याबद्दल ह्या ‘ध्वजाकडे’ विचारणा करतील तो जेथे असेल तेथे वैभव नांदेल.

यशया 60:8

लोकांकडे पाहा! आकाशात वेगाने ढग सरकावेत त्याप्रमाणे ते घाईने तुझ्याकडे येत आहेत ते जणू घरट्याकडे उडत येणारे पारवे आहेत.

Interlinear

Choose Theme