Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 5:12 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 5:12 · मराठी बायबल

प्रेषितांनी पुष्कळसे चमत्कार व सामर्थ्यशाली गोष्टी केल्या. सर्व लोकांनी या गोष्टी पाहिल्या. आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत.

Cross references

मार्क 16:20

शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुर्वार्तेची घोषणा केली. प्रभुने त्यांच्याबरोबर कार्य केले, व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली.

योहान 10:23

येशू मंदिरातील शलमोनाच्या देवडीतत होता.

प्रेषितांचीं कृत्यें 1:14

हे सर्व प्रेषित एकत्र राहत होते. ते एकाच उद्देशाने सतत प्राथेना करीत होते. काही स्त्रिया, मरीया येशूची आई आणि त्याचे भाऊ प्रेषितांबरोबर होते.

प्रेषितांचीं कृत्यें 2:42

सर्व विश्वासणारे एकत्र भेटत असत. ते त्यांचा वेळ प्रेषितांची शिकवण शिकण्यात घालवीत. विश्वासणारे एकमेकांशी सहभागिता करीत. ते एकत्र खात आणि एकत्र प्रार्थना करीत.

प्रेषितांचीं कृत्यें 2:46

सर्व विश्वासणारे मंदिरामध्ये दररोज एकत्र जमत. त्या सर्वांचा उद्देश सारखाच होता. ते त्यांच्या घरामध्ये एकत्र खात. आपले अन्न इतरंना वाटण्यात त्यांना फार आनंद होत असे आणि आनंदी मनाने ते खात असत.

प्रेषितांचीं कृत्यें 3:6

परंतु पेत्र म्हणाला, “माझ्याकडे सोने किंवा चांदी काही नाही, परंतु माझ्याकडे दुसरे काही तरी आहे, ते मी तुला देतो: नासरेथच्या येशू रिव्रस्ताच्या नावाने ऊठ आणि चालू लाग!”

प्रेषितांचीं कृत्यें 3:11

तो लंगडा मनुष्य पेत्र व योहान यांना बिलगून उभा होता. सर्व लोक आश्चर्यचकित झाले होते. कारण तो मनुष्य बरा झाठा होता. ते पेत्र व योहान उभे असलेल्या शलमोनाच्या द्वारमंडपाकडेधावत येऊ लागले.

प्रेषितांचीं कृत्यें 4:30

तुझे सामर्थ्य दाखवून आम्ही धीट बनण्यासाठी आम्हांला मदत कर; आजारी लोकांना बरे कर, पुरावे दे आणि चमत्कार कर, जे येशू जो तुझा पवित्र सेवक याच्या सामर्थ्यांने घडतील.’

प्रेषितांचीं कृत्यें 4:32

विश्वासणाऱ्यांचा हा परिवार एक मनाने व ऐक्याने राहत असे. ते एकचित्त होते. परिवारामधील कोणीही आपल्या मालमत्तेवर स्वतंत्र अधिकार सांगत नसे. उलट प्रत्येक गोष्ट ते वाटून घेत.

प्रेषितांचीं कृत्यें 9:33

लोद येथे त्याला ऐनेयास नावाचा माणूस आढळला. त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता.

प्रेषितांचीं कृत्यें 9:40

पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले. त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, “तबिथा ऊठ!” तेव्हा तिने डोळे उघडले, जेव्हा तिने पेत्राला पाहीले तेव्हा ती उठून बसली.

प्रेषितांचीं कृत्यें 14:3

म्हणून पौल व बर्णबाने त्या ठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला. आणि धैर्याने येशूविषयी सांगत राहीले. पौल व बर्णबाने देवाच्या कृपेविषयी संदेश दिला. देवाने त्यांना पौल व बर्णबाला चमत्कार व अदूभुत कृत्ये करण्यास मदत करुन ते जे काही सांगत होते ते खरे ठरविले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:8

लुम्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते तो जन्मत:च पांगळा जन्मला होता. व कधीच चालला नव्हता.

प्रेषितांचीं कृत्यें 16:18

तिने हे असे बरेच दिवस केले. त्यामुळे पौल विचलित झाला. मग तो वळला व त्या आत्म्याला म्हणाला, ‘येशू रिव्रस्ताच्या सामर्थ्याने, मी तुला आज्ञा देतो, तिच्यातून बाहेर निघ!’ ताबडतोब तो आत्मा बाहेर आला.

प्रेषितांचीं कृत्यें 19:11

देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले.

प्रेषितांचीं कृत्यें 28:9

हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले.

रोमकरांस 15:19

अदभुते, चमत्काराच्या व देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने मी यरुशलेमेपासून इल्लूरिकमाच्या सभोवती ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याचे पूर्ण केले आहे.

2 करिंथकरांस 12:12

प्रेषितांची चिन्हे ही आहेत: चिन्हे, चमत्कार, अदभुत कृत्ये ही खरोखरच सर्व सहनशीलतेने मी तुम्हांमध्ये केली.

इब्री लोकांस 2:4

देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भुत कृत्यांद्वारे, आणि तिरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.

Interlinear

Choose Theme