Home Bibles ☰ Books प्रेषितांचीं कृत्यें 28:9 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 28:9 · मराठी बायबल

हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले.

Cross references

मत्तय 4:24

येशूविषयीची बातमी सर्व सूरीया देशभर पसरली; मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षाघाती होते अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणी त्याने त्यांना बरे केले.

मार्क 6:54

ते नावेतुन उतरले, तेव्हा लोकांनी येशूला ओळखले.

प्रेषितांचीं कृत्यें 5:12

प्रेषितांनी पुष्कळसे चमत्कार व सामर्थ्यशाली गोष्टी केल्या. सर्व लोकांनी या गोष्टी पाहिल्या. आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत.

प्रेषितांचीं कृत्यें 5:15

त्यामुळे पेत्र रस्त्याने जाऊ लागला म्हणजे त्याची सावली रोगी व आजारी लोकांच्यावर पडावी यासाठी लोक त्यांना वाटेवर खाट अगर अंथरुणावर ठेवीत असत.

Interlinear

Choose Theme