लोद येथे त्याला ऐनेयास नावाचा माणूस आढळला. त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता.
Cross references
काही लोक त्याच्याकडे पक्षाघाती मनुष्याला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते.
त्या लोकांमध्ये एक स्त्री होती. ती बारा वर्षांपासून रक्तस्रावाने पीडलेले होती.
नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “किती काळ हा असा आहे?”वडीलांनी उत्तर दिले, “बाळपणापासून हा असा आहे.
ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. ज्या बंधनात ती होती त्यापासून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?”
तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला एक रोगी पडून होता.
येशू चालला असताना त्याने एक आंधळा मनुष्य पाहिला. हा मनुष्य त्याच्या जन्मापासूनआंधळा होता.
परंतु त्याला आता कसे दिसायला लागले आणि त्याचे डोळे कोणी बरे केले हे आम्हांला माहीत नाही. त्यालाच विचारा. तो स्वत: बद्दल सांगण्याइतका सुज्ञ झाला आहे.
जेव्हा ते मंदिरात जाऊ लागले, तेव्हा त्या ठिकाणी एक मनुष्य होता. हा मनुष्य जन्मापासूनचा लंगडा होता. त्याला चालता येत नव्हते. म्हणून काहीं मित्र त्याला उचलून घेऊन आले. दररोज त्याचे मित्र त्याला मंदिराकडे आणीत असत. ते त्या लंगड्या माणसाला मंदिराच्या एका दरवाजाजवळ ठेवीत असत. या दरवाजाचे नाव सुंदर दरवाजा असे होते. तेथे तो मनुष्य मंदिरात येणाऱ्या लोकांकडे भीक मागत असे.
लुम्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते तो जन्मत:च पांगळा जन्मला होता. व कधीच चालला नव्हता.