Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 27:24 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 27:24 · मराठी बायबल

आणि तो दूत म्हणाला, ‘पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे. तुझ्याबरोबर प्रवास करणारे जे लोक आहेत, त्यांच्या जीवाचे रक्षण करण्याचे वचन देवाने मला दिले आहे.’

Cross references

उत्पत्ति 12:2

मी तुला आशीर्वाद देईन; तूझ्या पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुझे नाव मोठे करीन, लोक तुझ्या नावाने इतरांना आशीर्वाद देतील,

उत्पत्ति 15:1

या सर्व गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांन्तात परमेश्वराचे वचन आले. देव म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको; मी तुझे रक्षण करीन आणि तुला आनंद होईल असे मी तुला मोठे प्रतिफळ देईन.”

उत्पत्ति 18:23

मग अब्राहामाने परमेश्वराजवळ जाऊन विचारले, “परमेश्वर तू दुष्ट लोकांचा नाश करताना चांगल्या लोकांचाही नाश करणार काय?

उत्पत्ति 19:21

तेव्हा देवदूत लोटाला म्हणाला, “ठीक आहे, मी तसेही करण्यास तुला परवानगी देतो; मी त्या नगराचा नाश करणार नाही;

उत्पत्ति 19:29

देवाने त्या खोऱ्यातील नगरांचा अशा रीतीने नाश केला परंतु तो करीत असताना, अब्राहामाने त्याला विचारलेल्या गोष्टींची त्याने आठवण ठेवली; लोट (अब्राहामचा पुतण्या) दरीतील नगरांत राहात होता. पण नगरांचा नाश करण्यापूर्वी देवाने लोटाला तेथून दूर पाठवून दिले होते.

उत्पत्ति 30:27

लाबान म्हणाला, “थांब, तुझी इच्छा असेल तर मला थोडे बोलू दे. परमेश्वराने केवळ तुझ्यामुळे मला आशीर्वादित केले आहे हे मी जाणतो.

उत्पत्ति 39:5

तेव्हा पोटीफराच्या सर्व कारभाराचा अधिकारी नेमल्यावर परमेश्वराने योसेफामुळे पोटीफराचे घरदार, शेतीबाडी इत्यादी त्याच्या मालकीच्या सर्व मालमत्तेस आशीर्वाद दिला.

उत्पत्ति 39:23

तुरुंगाच्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व गोष्टीसाठी योसेफावर विश्वास ठेवला; परमेश्वर योसेफाबरोबर होता म्हणून हे सर्व काही झाले. योसेफ जे काही करी त्यात परमेश्वर त्याला यश देई.

उत्पत्ति 46:3

देव म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे; पाहा, मिसर देशास जाण्यास तू भिऊ नको

1 राजे 17:13

तेव्हा एलीया तिला म्हणाला, “काही काळजी करु नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे त्याची लहानशी भाकर करुन मला आणून दे मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर.

2 राजे 6:16

अलीशा म्हणाला, “घाबरु नको! अरामच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य किती तरी मोठे आहे!”

ईयोब 35:8

ईयोब, तू ज्या चांगल्या आणि वाईट गोष्टी करतोस त्यांचा परिणाम तुझ्यावर आणि तुझ्यासारख्या इतरांवर होतो. त्यामुळे देवाला मदत होते किंवा त्याला दु:ख होते असे नाही.

यशया 41:10

काळजी करू नकोस मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस. मी तुझा देव आहे. मी तुला मदत करीन. मी माझ्या चांगलुपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन.

यशया 43:1

याकोब, परमेश्वराने तुला जन्म दिला. इस्राएल, परमेश्वराने तुला निर्मिले. आता देव म्हणतो, “भिऊ नकोस मी तुझे रक्षण करीन. मी तुला निवडले आहे. तू माझा आहेस.

यशया 58:11

परमेश्वर नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करील. ओसाड प्रदेशात तो तुमचा आत्मा तृप्त करील. तो तुमची हाडे मजबूत करील. भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल. सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही असाल.

विलापगीत 3:57

मी धावा करताच तू आलास. तू मला म्हणालास, “घाबरू नकोस.”

मीखा 5:7

मग पुष्कळ राष्ट्रांमध्ये विखुरलेले याकोबचे वाचलेले लोक, परमेश्वराकडून पडलेल्या आणि माणसांवर अवलंबून नसलेल्या दवाप्रमाणे वाटतील. कोणासाठी पण न थांबणाऱ्या गवतावरच्या सरीप्रमाणे ते असतील.

मत्तय 10:18

माझ्यामुळे ते तुम्हांला राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व यहूदीतर लोकांसमोर माझ्याविषयी सांगाल.

मत्तय 10:28

जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्याला भ्या.

योहान 11:9

येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाहीत? जर एखादा दिवसा चालतो, तर त्याला ठेच लागत नाही. कारण तो या जगाचा प्रकाश पाहतो.

प्रेषितांचीं कृत्यें 9:15

परंतु प्रभु म्हणाला, “जा! एका महत्वाच्या कामाकरिता मी त्याला निवडले आहे, माझ्याविषयी त्याने राजांना, यहूदी लोकांना, आणि दुसऱ्या राष्ट्रांना सांगितले पाहिजे.

प्रेषितांचीं कृत्यें 18:9

एके रात्री, प्रभु स्वप्नामध्ये पौलाशी बोलला, “घाबरु नको! बोलत राहा. शांत राहू नको!

प्रेषितांचीं कृत्यें 19:21

या गोष्टी घडल्यानंतर पौलाने मनात ठरविले की, मासेदोनिया व अखया या प्रांतांतून प्रवास करीत पुढे यरुशलेमला जायचे. तो म्हणाला, “मी तेथे गेल्यांनतर मला रोमदेखील पाहिलेच पाहिजे.”

प्रेषितांचीं कृत्यें 23:11

त्या रात्री प्रभु पौलाजवळ उभा राहिला. आणि म्हणाला, “धीर धर! कारण जशी तू माइयाविषयी यरुशलेममध्ये साक्ष दिलीस तशी तुला माइयाविषयी रोम येथे साक्ष द्यावी लागेल.”

प्रेषितांचीं कृत्यें 25:11

मी जर काही गुन्हा केला असेल तर मला मरणदंड झाला पाहिजे. आणि त्यापासून सुटका व्हावी असा प्रयत्न मी करणार नाही. परंतु जे आरोप हे लोक माझ्यावर करीत आहेत, ते खरे नसतील तर मला कोणी यांच्या हाती देऊ शकणार नाही, मी आपले गाऱ्हाणे कैसरासमोर मांडू इच्छितो.”

प्रेषितांचीं कृत्यें 27:37

आम्ही सर्व मिळून जहाजात दोनशे शाहातर लोक होतो.

प्रेषितांचीं कृत्यें 27:44

बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले. अशा रीतीने जहाजातील सर्व जण सुखरुपपणे भूमीवर पोहोंचले.

2 तीमथ्थाला 4:16

पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही. त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले. देवाकडून हे त्यांच्याविरुद्ध मोजले जाऊ नये.

याकोब 5:16

म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.

प्रकटीकरण 1:17

जेव्हा मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या माणसा सारखा त्याच्या पायजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माइयावरठेवला आणि म्हणाला, “घाबरु नको! मी पहिला आणि शेवटला आहे. मी जिवंत आहे,

प्रकटीकरण 11:5

जर एखाद्या व्यक्तीने त्या साक्षीदारांना दुखविण्याचा प्रयत्नकेला तर त्यांच्या तोंडातून अग्नि निघून त्यांच्या शत्रूंना भस्म करीत राहत असे. जो कोणी त्यांना इजा करण्याचा प्रयत्नकरीत असे त्याला अवश्य मरावे लागे.

Interlinear

Choose Theme