Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 24:1 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 24:1 · मराठी बायबल

पाच दिवसांनतर हनन्या कैसरिया येथे गेला. हनन्या मुख्य याजक होता. हनन्याने आपल्याबरोबर काही यहूदी वडीलजन आणि तिर्तुल्ल नावाचा वकील यांना कैसरिया येथे नेले; त्यांनी राज्यपालापुढे पौलावरिल दोषारोप सादर केले.

Cross references

स्तोत्रसंहिता 11:2

दुष्ट लोक शिकाऱ्यासारखे असतात. ते अंधारात लपून बसतात. ते धनुष्याची दोरी खेचतात. ते त्यांचा बाण लक्ष्यावर रोखतात आणि तो चांगल्या आणि सत्यवादी माणसाच्या ह्दयात सरळ सोडतात.

यशया 3:3

देव सैनिक शासक व शासनकर्त्ते यांना दूर करील. निपुण सल्लागार व जादूटोणा करून भविष्यकथन करण्याचा प्रयत्न करणारे चाणाक्ष लोक यांनाही दूर ठेवील.

प्रेषितांचीं कृत्यें 12:21

हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरविला. त्या दिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता. तो सिंहासनावर बसून लोकांसमोर भाषण करु लागला.

प्रेषितांचीं कृत्यें 21:27

सात दिवस जवळ जवळ संपत आले होते. परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला मंदिरात पाहिले. त्यानी लोकांना भडकाविले व त्याला (पौलाला) धरले.

प्रेषितांचीं कृत्यें 23:2

तेव्हा मुख्य याजक हनन्या याने पौलाच्या जवळ उभे राहिलेल्यांना पौलाच्या थोबाडीत मारण्यास सांगितले.

प्रेषितांचीं कृत्यें 23:24

खोगीर घातलेला घोडा पौलासाठी तयार ठेवा. आणि त्याला राज्यपाल फेलीक्स यांच्याकडे सुखरुप न्या.”

प्रेषितांचीं कृत्यें 23:30

जेव्हा या मनुष्याला जिवे मारण्याचा कट रचला गेल्याचे मला कळले तेव्हा मी त्याला ताबडतोब आपल्याकडे पाठविले.

प्रेषितांचीं कृत्यें 23:35

“तुझ्यावर दोष ठेवणारे आले म्हणजे तुझे ऐकेन.” पौलाला हेरोदाच्याराजवड्यात पहाऱ्यात ठेवावे असा हुकूमराज्यपालाने दिला.

प्रेषितांचीं कृत्यें 24:11

यरुशलेम येथे उपासनेसाठी जाऊन मला बारोपेक्षा जास्त दिवस झालेले नाहीत, ही गोष्ट खरी आहे की नाही, हे आपण पडताळून पाहू शकता

प्रेषितांचीं कृत्यें 25:2

मुख्य याजकांनी आणि यहूदी पुढाऱ्यांनी फेस्तच्या पुढे पौलावरील आरोप सादर केले.

प्रेषितांचीं कृत्यें 25:15

जेव्हा मी यरुशलेम येथे होतो, तेव्हा यहूदी लोकांचा मुख्य याजक आणि वडीलजन यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद केली. आणि त्याला दोषी ठरवावे अशी मागणी केली.

1 करिंथकरांस 2:1

म्हणून बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो, तेव्हा मी देवाचे रहस्यमय सत्य मानवी ज्ञानाने किंवा वक्तृत्वकलेने सांगण्यासाठी आलो नाही.

1 करिंथकरांस 2:4

माझे भाषण व संदेश हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते, ते आत्मा आणि सामर्थ्य यांचा पुरावा असलेले होते.

Interlinear

Choose Theme