Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 23:30 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 23:30 · मराठी बायबल

जेव्हा या मनुष्याला जिवे मारण्याचा कट रचला गेल्याचे मला कळले तेव्हा मी त्याला ताबडतोब आपल्याकडे पाठविले.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 9:24

यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते. व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला.

प्रेषितांचीं कृत्यें 15:29

कोणतेही अन्न जे मूर्तीला वाहिले आहे ते खाऊ नका रक्त चाखू नका गुदमरुन मारलेले प्राणी खाऊ नका. कोणत्याही प्रकारचे अनैतिक पाप करु नका.जर तुम्ही या गोष्टींपासून दूर राहाल, तर तुम्ही चांगले कराल आता आम्ही तुमचा निरोप घेतो कळावे.’

प्रेषितांचीं कृत्यें 23:12

दुसऱ्या सकाळी काही यहूदी लोकांनी एकजूट करुन कट रचला, त्याना पौलाला जिवे मारायचे होते. यहूदी लोकांनी अशा प्रकारची शपथ वाहिली की, पौलाला ठार मारेपर्यंत अन्नपाणी सेवन करायचे नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 23:20

तो मुलगा म्हणाला, “यहूदी लोकांनी असे ठरविले आहे की, पौलाला घेऊन तुम्हांला उद्या धर्मसभेपुढे यायला सांगायचे, व अशा बहाण्याने त्याला आणायचे की, जणू काय त्यांना पौलाची अधिक बारकाईने चौकाशी करायची आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 23:35

“तुझ्यावर दोष ठेवणारे आले म्हणजे तुझे ऐकेन.” पौलाला हेरोदाच्याराजवड्यात पहाऱ्यात ठेवावे असा हुकूमराज्यपालाने दिला.

प्रेषितांचीं कृत्यें 24:6

त्याने देवाचे मंदिर विटाळण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्याला धरले

प्रेषितांचीं कृत्यें 24:19

पण आशियातील काही लोक तेथे हजर होते.

प्रेषितांचीं कृत्यें 25:5

तुमच्यातील काही पुढाऱ्यांनी माझ्याबरोबर तिकडे खाली यावे, आणि जर त्या मनुष्याने काही चूक केली असेल तर त्याच्यावर दोषारोप ठेवावा.”

प्रेषितांचीं कृत्यें 25:16

वादी व प्रतिवादी यांना एकमेकांसमोर आणल्याशिवाय आणि आरोपीला आपला बचाव करण्याची संधि मिळेपर्यंत, त्याला इतरांकडे सोपविण्याची रोमी लोकांची रीत नाही. असे मी यहूदी लोकांना सांगितले.

2 करिंथकरांस 13:11

शेवटी बंधूनो, आपण भेटू या, परिपूर्णतेकडे ध्येय असू द्या. जसे मी तुम्हांला सांगितले तसे करा. एका मनाचे व्हा, शांतीने राहा. आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर असेल.

Interlinear

Choose Theme