प्रेषितांचीं कृत्यें 2:12 · मराठी बायबल
ते लोक आश्चर्यचकित झाले, आणि गोंधळून गेले. त्यांनी एकमेकांना विचारले, “काय चालले आहे?”
Cross references
लूक 15:26
त्याने एका नोकराला बोलावून विचारले, “हे सर्व काय चालले आहे?’
लूक 18:36
जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्याया समुदायाचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले हे काय चालले आहे.
प्रेषितांचीं कृत्यें 2:7
यामुळे यहूदी लोक अचंबित झाले. त्यांना हे समजत नव्हते की, प्रेषित हे कसे करु शकले. ते म्हणाले, “पाहा! ही माणसे (प्रेषित) ज्यांना आपण बोलताना ऐकत आहोत ती सर्व गालीलीआहेत!
प्रेषितांचीं कृत्यें 10:17
पेत्र भयचकित होऊन या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा याविषयी विचार करु लागला. ज्या लोकांना कर्नेल्याने पाठविले होते, त्यांना शिमोनाचे घर सापडले. ते दाराजवळ उभे होते.
प्रेषितांचीं कृत्यें 17:20
तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात त्या आमच्यासाठी नवीन आहेत. यापूर्वी आम्ही हे कधीही ऐकले नाही. या शिकवणीचा अर्थ काय हे आम्हांला जाणून घ्यायचे आहे.”